आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान
पुणे : आज कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणारंय. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाहांपासून (Amit Shaha)ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)प्रचारात उतरल्याचं दिसून आलं. भाजपनं मोठी ताकद प्रचारात लावली होती. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. आज मतदार कोणाला मतदान करणार हे पाहावं लाणारंय.
चिंचवडमध्ये तिरंगी लढत होतेय तर कसब्यामध्ये दुहेरी लढत होत असल्याचं दिसून येतंय. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवताहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होतेय.
Kasba By Election: पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, हा रडीचा डाव
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप येथून निवडणूक लढवताहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेते भाजपच्या उमेदावाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं.
महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. त्यामुळं मतदार कोणाला कौल देणार, याकडं राज्याचं लक्ष लागलंय.
270 मतदान केंद्रांवर कसबा मतदारसंघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510 मतदार केंद्रावर मतदान होणारंय. आज पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.