Download App

PM मोदींच्या पुणे दौऱ्याचा बोजा महापालिकेवर; एक कोटी 85 लाखांच्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा यावर्षी 1 ऑगस्ट रोजी पुणे दौरा पार पडला. यावेळी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण पंतप्रधान मोदी यांचा हाच दौरा पुणे महापालिकेला तब्बस दोन कोटी रुपयांना पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात झालेला खर्च महापालिकेच्या तिजोरीतून वसूल करण्यात येणार आहे. या दौऱ्यात झालेला एक कोटी 85 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. (expenses incurred on Prime Minister Narendra Modi’s visit to Pune will be recovered from the municipal treasury)

Maratha Protest : आंदोलनाचे लोण पुण्यापर्यंत, नवले पुलावर जाळपोळ; वाहतूक विस्कळीत

असा झाला होता खर्च :

पंतप्रधान मोदी यांच्या शिवाजीनगर येथील कार्यक्रमासाठी मंडप आणि आसन बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी तब्बल सात हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती. हाच सर्व खर्च महापालिकेवर टाकण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम ऐन पावसाळ्यात असल्याने गैरसोय होऊ नये, यासाठी बंदिस्त जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला होता.

Maratha Reservation : पुण्यातून मराठवाड्यात जाणारी बससेवा ठप्प !

या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच ‘जी-20’परिषदेच्या कार्यक्रमाला मंडप टाकण्यासाठी जो ठेकेदार नियुक्त केला होता, त्यांच्याकडूनच ही कामे तातडीने करून घेण्यात आली, असे आयुक्तांनी ठेवलेल्या खर्च प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. चार ठेकेदारांना 1 कोटी 85 लाख रुपये दिले जाणार आहेत. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाल मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

follow us