पवारांकडून अजित गव्हाणे यांची हकालपट्टी पण अजितदादांनी 24 तासात घेतला ‘हा’ निर्णय

ajit gavhane : 2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करत अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान बंडखोर गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाकडून कठोर कारवाई केली जात आहे. काल पुणे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शरह जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit […]

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (22)

ajit gavhane

ajit gavhane : 2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करत अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान बंडखोर गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाकडून कठोर कारवाई केली जात आहे. काल पुणे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शरह जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. या कारवाईनंतर अवघ्या 24 तासांतच त्यांची अजित पवार गटाने त्याच पदावर नियुक्ती केली. ( Expulsion of Ajit Gavhane from Sharad Pawar group but Ajit pawar selected pipari chanchawad city president)

राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांवर पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. त्यांची ही कृती पक्ष आणि विरोधी पक्षाची ध्येय आणि धोरणे यांच्याशी विसंगत आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला जाहीर पाठिंबा दिल्याने पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची मंगळवारी (18) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार गटातून हकालपट्टी केली. अवघ्या 24 तासांत बुधवारी (ता. 19) अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची पुन्हा मूळ पदावर नियुक्ती केली आहे.

पैरा एथलेटिक्स 2023 चैंपियनशिपमध्ये भारताची चमकदार कामगिरी, 27 पदकांसह पटकावला तिसरा क्रमांक 

मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत तटकरे यांनी गव्हाणे यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, राहुल भोसले, शाम लांडे, प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.

अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या महिला अध्यक्षांवरही बडतर्फीची अशीच कारवाई करण्यात आली होती. प्रा. कविता आल्हाट यांच्यावर शरद पवार गटाच्या प्रदेश महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी ही बडतर्फीची कारवाई केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांची त्याच पदावर नियुक्ती केली. तर याआधी राष्ट्रवादीतील मोठे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचीही पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं पक्षातून हकालपट्टी केली होती.

Exit mobile version