Download App

शरद पवारांना श्रीकृष्ण म्हणणाऱ्या, प्रदीप गारटकरांची राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी

  • Written By: Last Updated:

Expulsion of Pradeep Gartkar : अजित पवारांच्या (Ajit Pawar)  बंडानंतर त्याच्यासोबत गेलेले तसेच त्याचे समर्थन करणाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तसेच पदावरून हकालपट्टी केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Gartkar) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पदावरून तसेच पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकतेच गारटकर यांना देण्यात आले आहे. (Expulsion of Pradeep Gartkar from the post of NCP Pune District President)

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काही दिवसापूर्वी राज्याच्या राजकारणात झालेल्या भूकंपावर प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित दादा अर्जुनाच्या रूपात आहेत आमचा मात्र अभिमन्यू झाला आहे. आम्ही शरद पवार यांचे का अजित पवार यांचे या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. काही आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याची भूमिका ठरवू. असे प्रदीप गारटकर म्हणाले होते.

त्यानंतर त्यांनाही अर्जुनसोबत म्हणजे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून प्रदीप गारटकर यांची राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी रडकुंडीला येऊन शरद पवारांना काय सांगितलं होतं?

जयंत पाटील या पत्रात म्हणतात महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये पक्षातील काही विद्यमान आमदारांनी सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सदर कृत्य पक्षविरोधी असून या आमदारांविरोधात पक्षाने अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. या सदस्यांना गारटकर यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याचे समजले. त्यांची ही कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत व पक्षविरोधी आहे. म्हणूनच २ जुलै २०२३ पासून पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच गारटकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Tags

follow us