Maharashtra Election : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम सुरू असून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशानुसार 3 डिसेंबर व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास 12 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदान अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी दिली आहे.
चॅलेंज देतो मुलीचं लग्न टोलेजंग करणार; इंदुरीकर महाराजांचा व्हिडीओ व्हायरल
सुधारित कार्यक्रमानुसार हस्तलिखिते (Maharashtra Election) तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- शुक्रवार 28 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- बुधवार 3 डिसेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 3 ते 18 डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- सोमवार 5 जानेवारी 2026 व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- सोमवार 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल.
अजित पवारांना न सांगता बिहारमध्ये उमेदवार? प्रफुल पटेल म्हणाले, पक्षाचे संघटन…
