Election Commission : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

Election Commission : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ

  • Written By: Published:
Election Commission

Election Commission : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी पात्रता-अपात्रतेचा निर्णय घेतील. त्यानुसार 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, 6 नोव्हेंबरनंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र 18 व 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल. 10 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून 30 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी (Graduates Constituencies) ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे.

इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती या संकेतस्थळावरील “Manual” या विभागात पाहता येईल. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

चाकणकरांविरूद्ध बोलणं पडलं महागात; रूपाली पाटील ठोंबरेंना राष्ट्रवादीची नोटीस, सात दिवसांची मुदत

follow us