पुणे : आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे कालीचरण महाराज (Kalicharan maharaj) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पुण्यात बोलताना कालीचरण यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले आहे. शाळेत खोटा इतिहास शिकवला जात आहे. धर्माच्या ज्ञानाचा प्रसार केला जात नसल्याने ही परिस्थिती ओढवली जात आहे. केवळ, रामायण, महाभारत यावरच न थांबता शाळेच्या अभ्यासक्रमात वेद याचा देखील समावेश करावा. यामुळे धर्माचा प्रसार होईल असे प्रतिपादन कालिचरण महाराज यांनी केले आहे.
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे कालीचरण महाराज आज पुण्यात आले होते. तिथीप्रमाणे साजरे होणारी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठानने आयोजित केल्या कार्यक्रमाला आज कालिचरण महाराज यांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच धर्माच्या प्रचारासाठी शाळांच्या अभ्यासक्रमात बदल करावे असेही कालिचरण यांनी म्हंटले आहे.
तसेच पुढे बोलताना कालीचरण म्हणाले, धर्माच्या शिक्षेचा अभाव हा हिंदूच्या नाशाचे कारण आहे. हिंदूंचे अनेक मंदिरांची तोडफोड मुस्लिमांकडून करण्यात आली. भारतापासून अनेक देश विभक्त झाले आहे याला देखील कारण म्हणजे धर्माचे अज्ञान होय. शाळा, कॉलेज, घर, मंदिर हे चार ठिकाण आहे ज्यामुळे धर्माचे ज्ञानाचा प्रसार होत नाही आहे. ज्याठिकाणाहून शक्य आहे त्या ठिकाणाहून धर्माच्या ज्ञानाचा प्रसार केला जावा असे कालीचरण महाराज म्हणाले.
रात्री झोपण्याआधी ‘या’ पदार्थांचे सेवन करणे टाळा, अन्यथा येतील अडचणी
शाळांमध्ये, कॉलजेमध्ये धर्मग्रंथांचे ज्ञान सुरु करणे हे केवळ त्या राज्यातील सत्ताधारी करू शकतात. शाळांमध्ये केवळ भगवतगीता, रामायण, महाभारत हे केवळ धर्मग्रंथ आहे. याशिवाय वेद देखील शाळेच्या अभ्यासक्रमात शिकवले पाहिजे यामुळे धर्माचा प्रसार होईल असे कालिचरण म्हणाले.
नितेश राणे तर तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा
आपल्या शाळांमध्ये खोटा इतिहास शिकवला जात आहे. अभ्यासक्रमात सांगितले की मुघल महान होते. ज्यांनी आपले मंदिरे तोडली ते काय महान होते? यामुळे आपल्याला शाळेत खोटा इतिहास शिकवला जातो आहे. आपल्या शाळा पैसे कसा कमवायचा हे देखील शिकवले जात नाही. शाळेत केवळ कर्मचारी कसे बनता येईल अशा पद्धतीने शिकवले जात आहे, अशा शब्दात कालीचरण महाराज यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढले.