Download App

शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दोनशे रुपये जास्त द्यावा; भगवानगडाचे सचिव घोळवे यांची मागणी

जे शेतकरी कारखाना परिसरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहेत अशा शेतकऱ्यांना ऊस तोडणी करताना वाहतूक पंधराशे रुपये टन लावण्याऐवजी त्यामध्ये टप्पा पाडावा.

  • Written By: Last Updated:

पुणे: राज्यात गेल्या वर्षी सर्वाधिक ऊस उत्पादन झाले आहे. त्यातून इथेनॉल बगास आणि मॉलिश, मॉलीशेस, साखर यांना चांगला भाव भेटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्यात यावी अशी मागणी वरिष्ठ पत्रकार, श्री क्षेत्र भगवानगडाचे सचिव व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी केली आहे.

याप्रकरणी त्यांनी साखर आयुक्त राहुल खेमनार यांना एक निवेदन दिले आहे. महाराष्ट्रामध्ये साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देण्यात यावी तसेच जे शेतकरी कारखाना परिसरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहेत अशा शेतकऱ्यांना ऊस तोडणी करताना वाहतूक पंधराशे रुपये टन लावण्याऐवजी त्यामध्ये टप्पा पाडावा, सर्वांना एक सरस निर्णय देऊ नये. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. 150 किलोमीटर वाहतूक केली तर टनामागे 1 हजार 500 रुपये साखर कारखानदार शेतकऱ्यांचे कापतात तसे न करता प्रत्येकाला टप्पे पाडावेत. एकदा शेतकरी पन्नास किलोमीटर अंतरावर असू शकतो त्याला देखील सरसकट नियम लावू नये, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला एक रकमी एफआरपी दोनशे रुपये जास्त देण्यात यावे. तसेच जे साखर कारखाने काटा मारतात म्हणजे शेतकऱ्यांची पिळवणूक करतात वजन काट्यामध्ये गरबड करतात अशा कारखान्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील घोळवे यांनी केली आहे

मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त ऊस तोडायला पैसे लेबरकडून घेतले जातात. एकरी 4000 ते 5000 रुपये घेतले जातात. याकडे देखील साखर आयुक्त यांनी त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी, लाखो ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून त्यांच्या मुलांचा शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भात देखील सरकारने त्वरित पावले उचलावी, अशी मागणी घोळवे यांनी केलीय.

follow us