मोठी बातमी, पुण्यातील डेक्कन परिसरात हाणामारी; 3 जणांना अटक

Pune Crime : पुण्यातील डेक्कन परिसरात शनिवारी एका किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी

Pune Crime

Pune Crime

Pune Crime : पुण्यातील डेक्कन परिसरात शनिवारी एका किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री डेक्कन चौपाटी (Deccan Chowpatty) परिसरात झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन चौपाटी येथे काही युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रुपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. उपस्थित नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

The Taj Story ‘या’ डायलॉग प्रोमोमुळे पुन्हा चर्चेत

यानंतर पुणे पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला आणि तातडीने तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी काही युवक सहभागी असल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरु आहे.

प्रेम आणि रहस्यांनी भरलेला ‘असंभव’; पोस्टर्सने वाढवली चित्रपटाची उत्सुकता

Exit mobile version