महिन्याभरापूर्वी उद्घाटन झालेल्या ससूनच्या नव्या इमारतीला आग; सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानाने वाचले शेकडो जीव

Pune Fire News: महिन्याभरापूर्वी उद्घाटन झालेल्या ससूनच्या नव्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आग लागल्याची माहिती मिळताच (Pune Fire News) अग्निशमन मुख्यालयातून एक आणि नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. (Pune News) ही आज दिनांक 09 रोजी राञी 8•10 वाजेच्या सुमारास […]

मोठी बातमी! पुण्यातील ससूनच्या हॉस्पिटलच्या नव्या इमारतीला आग

मोठी बातमी! पुण्यातील ससूनच्या हॉस्पिटलच्या नव्या इमारतीला आग

Pune Fire News: महिन्याभरापूर्वी उद्घाटन झालेल्या ससूनच्या नव्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आग लागल्याची माहिती मिळताच (Pune Fire News) अग्निशमन मुख्यालयातून एक आणि नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. (Pune News) ही आज दिनांक 09 रोजी राञी 8•10 वाजेच्या सुमारास घडली आहे. सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानाने शेकडो जीव वाचले आहेत.


घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. ससून हॉस्पिटलतील नवीन इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच जवानांनी वर धाव घेतली, तिथे वार्डमधील शौचालयामागे असणाऱ्या डक्टमधे आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयातील सुरक्षारक्षक यांनी तातडीने अग्निरोधक उपकरण वापरुन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सध्या हॉस्पिटलच्या वार्डमधील सर्व रुग्ण सुखरुप आहेत. संपूर्ण आग विझली असून मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र या आगीचे कारण अंदाजे शौचालयात कोणी धुम्रपान केल्याने लागली असावी.असा अंदाज लावला जात आहे.

Exit mobile version