काल देशभरात दिवाळीचा सण साजरा झाला. काल लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे (Pune) शहरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. आगीच्या घटनांची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जलद कारवाईमुळे सर्व आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना
१} ०५•१२ – हडपसर, गल्ली क्रमांक १५ येथे मोकळ्या जागेत आग (हडपसर अग्निशमन वाहन)
२} ०७•२० – वारजे, चौधरी दत्त मंदिर जवळ दुकानात आग (वारजे व कोथरूड अग्निशमन वाहन)
३} ०७•४५ – नरहे गाव, झील कॉलेजमागे एका इमारतीत गच्चीवर आग (नवले अग्निशमन वाहन)
४} ०७•५८ – काळेपडल, गजानन महाराज मंदिर जवळ गच्चीवर आग (काळेपडल अग्निशमन वाहन)
५} ०७•५९ – बुधवार पेठ, दत्त मंदिर जवळ गच्चीवर आग (कसबा अग्निशमन वाहन)
६} ०८•०४ – कसबा पेठ, साततोटी पोलिस चौकीमागे , कागदीपुरा येथे एका इमारतीत आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
७} ०८•१० – विमान नगर, संजय पार्क येथे नारळाच्या झाडाला आग (येरवडा अग्निशमन वाहन)
८} ०८•२२ – मांजरी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला गवताला आग (हडपसर अग्निशमन वाहन)
९} ०८•२५ – भवानी पेठ क्षेञिय कार्यालय जवळ गॅलरीमध्ये जाळीला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
१०} ०८•२७ – नगर रस्त्यावर वडगाव शेरी, गणेश नगर येथे एका दुचाकी वाहनाला आग (खराडी अग्निशमन वाहन)
११} ०८•२९ – धानोरी, कलवड वस्ती येथे मोकळ्या मैदानात कचरयाला आग (धानोरी अग्निशमन वाहन)
१२} ०८•३५ – वारजे, तपोधाम कमानी जवळ एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग ( वारजे अग्निशमन वाहन)
१३} ०८•३६ – कसबा पेठ, कागदीपुरा येथील नागझरीमध्ये कचऱ्याला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)
१४} ०८•३६ – धायरी फाटा येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग (नवले अग्निशमन वाहन)
१५} ०८•४० – विमान नगर, जीवन सुपर मार्केट जवळ एका गोडाऊनमध्ये आग (येरवडा अग्निशमन वाहन परस्पर)
१६} ०८•४६ – शुक्रवार पेठ, फडगेट पोलिस चौकी समोर घराच्या छतावर आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
१७} ०८•५१ – घोरपडी पेठ, मोठा गणपती मंडळ येथे चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
१८} ०८•५४ – गणेश पेठ, डुल्या मारुती चौक येथे एका इमारतीत गच्चीवर आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)
१९} ०९•०२ – बाणेर, छञपती शिवाजी महाराज पुतळा नजीक एका घरामध्ये आग (बाणेर अग्निशमन केंद्र वाहन)
२०} ०९•२५ – बी टी कवडे रोड एका इमारतीत पार्किंगमध्ये आग (बी टी कवडे रोड अग्निशमन वाहन)
२१} ०९•२६ – वानवडी, कामठे उद्यानात जवळ एका वर्कशॉपच्या पञ्यावर प्लास्टिकला आग (कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन)
२२} ०९•२८ – बाणेर, पॅनकार्ड क्लब रोड येथील इमारतीत एका घरामध्ये आग (पाषाण अग्निशमन केंद्र वाहन)
२३} ०९•३८ – मंगळवार पेठ, भीमनगर कमान येथे वाड्यामध्ये घराला आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)
२४} ०९•४५ – विश्रांतवाडी, कळस, गंगाकुंज सोसायटीमध्ये दुसर्या मजल्यावर घरामध्ये आग (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
२५} ०९•५५ – येरवडा, चिञा चौकात एका घरात आग (येरवडा अग्निशमन केंद्र वाहन)
२६} ०९•५७ – सोलापूर बाजार येथे घरात पोटमाळ्यावर आग (पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन केंद्र वाहन)
२६} १०•०२ – मार्केट यार्ड, गेट नंबर नऊ जवळ झाडाला आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
२७} १०•०४ – दारुवाला पुल, देवजी बाबा चौकात घराच्या छतावर आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)
२८} १०•०६ – वडगाव बुद्रुक येथे मोकळ्या मैदानात कचरयाला आग (सिंहगड अग्निशमन केंद्र वाहन)
२९) १०•०८ – धानोरी, भैरव नगर येथे झाडाला आग (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)
३०} १०•११ – सिंहगड रोड, नवशा मारुती मंदिर, सावित्रीबाई फुले वसाहत येथे घरामध्ये आग (जनता वसाहत अग्निशमन केंद्र वाहन)
३१} १०•१६ – सदाशिव पेठ, उद्यान प्रसाद कार्यालय एका इमारतीत पार्किंगमध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
३२} १०•१९ – सिंहगड रोड, मधुकर हॉस्पिटल जवळ एका घरात आग (नवले अग्निशमन केंद्र वाहन)
३३} १०•२४ – बाणेर-सुस रोड येथे एका इमारतीत अकराव्या मजल्यावर घरात आग (बाणेर अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)
३४} १०•२६ – सिंहगड रोड, हिंगणे चौक येथे घरात आग (जनता व सिंहगड अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)
३५} १०•४० – काळेपडल, तुकाई टेकडी जवळ गवताला आग (काळेपडल अग्निशमन केंद्र वाहन)
३६} १०•४९ – बिबवेवाडी, कोणार्क गार्डन सोसायटीत आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन व मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वॉटर टँकर)
३७} १०•५२ – काशेवाडी, गल्ली क्रमांक १० येथे कचऱ्याला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
३८} ११•१० – कोथरूड, म्हाडा कॉलनी जवळ केबलला (वायर) आग (कोथरूड अग्निशमन केंद्र वाहन)
३९} ११•२६ – दांडेकर पूल चौक येथे दुकानात आग (जनता व एरंडवणा अग्निशमन केंद्र वाहन आणि मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वॉटर टँकर)
४०} ११•४० – नाना पेठ भाजी मंडई येथे एका इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाला आग ( मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
४१} ११•४५ – औंध, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ इमारतीत चौथ्या मजल्यावर घरामध्ये आग (औंध अग्निशमन केंद्र वाहन)
४२} ११•४८ – धायरी, डिएसके विश्व येथे बंद घरामध्ये आग (नवले अग्निशमन केंद्र वाहन)