राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी; अजित पवारांची राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट!

- राज्यभरामध्ये सध्या सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. त्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- तसेच अनेक ठिकाणी धरणांतून पाणी सोडल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.
- दुसरीकडे मंगळवारी मुंबईमध्ये चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावर मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल जागीच थांबली होती.
- या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.
- त्यांनी आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली
- मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या.