Download App

राष्ट्रवादीपाठोपाठ पुणे शहरातील सहा जागांवर ठाकरे गटाचीही नजर… महाविकास आघाडीत कुस्ती सुरु

पुण्यातील आठही जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) घवघवीत यश मिळाले. त्यानंतर आघाडीतील तिन्ही पक्षांचा कॉन्फिडन्सही कमालीचा वाढला आहे. या वाढलेल्या कॉन्फिडन्समुच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. यातच पुण्यातील जागांचाही समावेश आहे. शहारातील आठही जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. यात शिवसेनेने तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार असणाऱ्या कसबा, हडपसर आणि वडगाव शेरी या मतदारसंघावरही दावा ठोकला आहे. (For all the eight seats in Pune, the Congress, NCP (Sharad Chandra Pawar) and Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) are in a tug-of-war.)

दोन दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आठ पैकी सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला. यात शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाचा समावेश होता. त्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनीही सहा मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. यात पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विद्यमान आमदार आहेत. तर हडपसर आणि वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

मोठी बातमी : आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंना जबर धक्का

याबाबत बोलताना मोरे म्हणाले, यापूर्वी शहरात शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते. आता शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली असून ताकदही वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला पुण्यात सहा जागा मिळाव्यात, असे वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पक्षाला जर हे सहा मतदारसंघ मिळाले तर इथून त्यांचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील. जगताप यांच्या दाव्यानंतर लगेचच ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुण्यात तरी सध्या बिघाडी पाहायला मिळत आहे.

Ghati Hospital: रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना सुमारे सव्वा लाखाच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दीड लाखांचे लीड तोडले आहे. थोडक्यात पुण्यात काँग्रेसचीही मोठी ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, लोकसभेत महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज