Download App

आम्ही बिना हुंड्याचं भाजपसोबत लग्न केलय; अखेर माजी आमदार संजय जगतापांचा प्रवेश ठरला

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Written By: Last Updated:

Sanjay Jagtap Will Join BJP : पुणे जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: जगताप यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. (BJP) जगताप यांनी आज सासवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपसोबत आम्ही बिना हुंड्याचं लग्न केलं आहे. यामध्ये माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसल्याची प्रतिक्रिया संजय जगताप यांनी दिली.

या प्रवेशामागे माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही अशी प्रतिक्रिया संजय जगताप यांनी यावेळी दिली आहे. पुरंदर, हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी संजय जगताप यांनी सासवडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी विधानसभेचा प्रचार केला नाही. संजय जगताप यांच्या पराभवांमध्ये मोठा वाटा हा आघाडीचा आहे यावरर प्रश्न विचारला असता, जगताप म्हणाले की, आघाडीने कायमच आम्हाला डोक्यावरती आपटलं आहे. तसंच, काँग्रेसला देखील त्यांनी संघटनात्मक शिस्त लावण्याचा सल्ला यावेळी दिला आहे.

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार संजय जगतापांचा पक्षाला रामराम

जगताप यांचे निकटवर्तीय आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पुरंदर-हवेली परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही सत्तेच्या जवळ जाण्याची चळवळ सुरू झाली आहे. ‘सत्तेशिवाय शहाणपण नाही,’ या भूमिकेतून अनेक कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांना भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे. जगताप यांचं संघटन क्षमता, विविध सामाजिक संस्थांमधील प्रभाव, आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी पाहता, भाजपसाठी ते फायदेशीर ठरू शकतात. भाजपच्या प्रदेश नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. संजय जगतापांचा भाजप प्रवेश हा काँग्रेस पक्षासाठी मोठा हादरा मानला जात आहे.

माझ कुटुंब आणि आम्ही सर्वजण आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सावडला भाजप प्रदेशाध्यक्ष मी भाजपमध्ये जात आहे असंही जगताप यावेळी म्हणाले. सर्व सामान्य कुटुंबातील आम्ही आहोत. त्यामुळे सामांन्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम काम केलं आहे आणि पुढेही करत राहणार आहोत असंही यावेळी ते म्हणाले. त्यामुळे आता त्यांच्या प्रवेशाला कुणाचा विरोध होतो का हे पाहण महत्वाचं आहे. येथील भाजप कार्यकर्त्यांशी जगताप यांचे चांगले संबंध असल्याने त्यांना जास्त विरोध होईल अस काही वाटत नाही अशीही चर्चा आहे.

follow us