Download App

अखेर शरद पवारांना पुण्यासाठी जिल्हाध्यक्ष मिळाला; अडचणीच्या काळात जुन्या सहकाऱ्यावर ‘विश्वास’

पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचा अखेर पुणे जिल्ह्यासाठीच्या जिल्हाध्यक्षपदाचा शोध संपला आहे. विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे (Jagannath Shewale) यांची राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या पुणे (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. शेवाळे यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. (Former Legislative Council Member Jagannath Shewale appointed as Pune District President of Nationalist Party)

राष्ट्रवादीचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपद आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर अजित पवार यांच्या गटाकडून गारटकर यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र शरद पवार यांच्या गटाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. त्यानंतर आता तब्बल 2 महिन्यांनंतर शरद पवार यांच्या गटाचा जिल्हाध्यक्षपदावरील चेहऱ्याचा शोध संपला आहे.

पुणेरी पगडी ! शोभतेय का ?; लोकसभेसाठी इच्छुक सुनील देवधरांनी विचारला प्रश्न

राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा व तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाचा विस्तार आणि संघटन वाढविण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा अधिक उज्वल कराल या उद्देशाने आपली पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात येत असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेवाळे यांना नियुक्तपत्र दिले. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ नेते म्हणून शेवाळे यांच्याकडे पाहिले जाते.

तयारीचे आदेश आले! विधानसभेसाठी पुण्यातून पवारांचा हुकमी एक्का मैदानात उतरणार

पिंपरी चिंचवडमधील शोध अद्याप कायम :

दरम्यान, पुणे (ग्रामीण) पदावरील चेहऱ्याचा शोध संपला असला तरीही पिंपरी चिंचवडमधील शोध अद्याप कायम आहे. पिंपरी-चिंचवडमधील एकूण 36 माजी नगरसेवकांनी पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. यात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील हाच कित्ता गिरवला. यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून गव्हाणेंवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे गव्हाणेंनंतर दुसरा शहराध्यक्ष नेमणे अपेक्षित होते. मात्र अजित पवार गटाला टक्कर देईल, असा कुठलाही चेहरा पवारांना सापडत नसल्याने शहराध्यक्षाची नियुक्ती रखडल्याची चर्चा आहे.

Tags

follow us