Download App

मुहूर्त ठरला! अजितदादांच्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, आझम पानसरे पवारांना साथ देणार…

आज पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

Azam Pansare Met Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावरही अजित पवार (Ajit Pawar) गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. काहीच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) अजित पवार गटाच्या 15 ते 20 नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे (Azam Pansare) यांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

सागरिका म्युझिकची यशस्वी 25 वर्ष पूर्ण’; ‘नानाछंद’ द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार 

पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला होता. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले. पक्षात फूट पडल्यानंतर शहरातील संघटना, आमदार, सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत गेले. तर शरद पवार यांच्यासोबत केवळ दोन माजी नगरसेवक राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे. आता शरद पवार गटात इनकमिंग सुरू झाली आहे. अशातच आज आझम पानसरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेती.

पोलीस भरती जीवावर बेतली, संगमनेरमधील युवक धावतांना कोसळला, अन्… 

शरद पवार यांच्यासोबतच्या आजच्या भेटीत पानसरे यांनी शहरातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. तसंच 20 जुलै रोजी शरद पवार यांच्या पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या मेळाव्याच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. या मेळाव्यातच 16 माजी नगरसेवकांसह आझम पानसरे हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. आझम पानसरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अजित पवार गटाने धसका घेतला आहे.

दरम्यान, आझम पानसरे हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील मोठे नाव आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात पानसरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पिंपरी -चिंचवडमध्ये पानसरेंचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा आहे.

follow us