Former Congress minister’s son joins BJP : आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. 15 जानेवारीला या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या अनुषंगाने राजकीय घडामोडींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. अशातच आता पुण्यातील(Pune) काँग्रेसच्या(Congress) गडाला सुरुंग लावण्यात भाजपला(Bjp) यश आलं आहे. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर(Balasaheb Shivarkar) यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर(Abhijit Shivarkar) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रशांत जगताप(Prashant Jugtap) यांच्या विरोधात वानवडी भागातून अभिजित शिवरकर यांना भाजपकडून उमेदवारी देणार असल्याचा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
महानगरपालिका निवडणूक अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच राजकीय घडामोडींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून भाजपमध्ये सातत्याने इनकॅमिन्ग सुरू आहे. अशातच माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांचा भाजपमधील प्रवेश हा काँग्रेससाठी पुण्यात मोठा धक्का मनाला जात आहे. प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशनानंतर फ्रंटफूटवर आलेली काँग्रेस आता पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिजित शिवरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 2007 च्या महापालिका निवडणुकीत मी पुणे महानगरपालिकेत सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. वानवडी भागातून मी अनेक कामं केली आहेत. 14 वर्षांच्या वनवासानंतर मी आज भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. माझ्या असंख्य सहकाऱ्यांसह मी आज भाजपमध्ये प्रवेश केला असून मी आतापर्यंतच्या राजकारणात नेहमी समाजकारण केले आहे. ज्या ठिकाणी मी पहिले होतॊईओची तिकडे एकनिष्ठ होतो , आता भाजपमध्ये देखील एकनिष्ठ राहणार असल्याचं यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी भाजपसोबत गेलो असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.
