Download App

वैष्णवीला दिलेली फॉर्च्युनर ते चांदीचे भांडे हगवणेंकडून काय-काय जप्त; पोलिस अधिकाऱ्याने यादीच वाचली

Vaishnavi Hagwane च्या माहेरहूनआलेल्या वस्तू हगवणेंकडून ताब्यात घेतल्या आहेत. त्यात कोणत्या वस्तू आहेत. यादी पोलिस अधिकाऱ्याने वाचून दाखवली

fortuner to silver utensils Wich give to Vaishnavi seized from Hagwane Police officer read list : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर राजकारणासह सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांची एक-एक कारवाई सुरू आहे. त्यात आता हगवणे कुटुंबाकडून पोलिसांनी वैष्णवीला तिच्या माहेरहून देण्यात आलेल्या अनेक वस्तू हगवणेंकडून ताब्यात घेतल्या आहेत. त्यात कोणत्या वस्तू आहेत. याची एक यादीच पोलिस अधिकाऱ्याने वाचून दाखवली आहे.

पोलिस अधिकाऱ्याने यादीच वाचली?

या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, वैष्णवी हगवणे हिला तिच्या माहेरवरून म्हणजे कस्पटे कुटुंबाकडून लग्नामध्ये एक फॉर्च्युनर गाडी, एक्टिवा, काही चांदीची भांडी, दोन पिस्तूल हे सर्व जप्त करण्यात आलं आहे. मात्र लग्नामध्ये देण्यात आलेले तब्बल 51 तोळे सोनं सोनेतारण कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आलं आहे. याबाबत पोलिसांचं फेडरल बँकेची बोलणं झालं आहे. याचे कागदपत्र देखील लवकरच पोलिसांच्या ताब्यात येथील त्याचबरोबर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोन आरोपी घटनेनंतर फरार होते. त्यावेळी त्यांनी कर्नाटकपर्यंत जो प्रवास केला. त्यामध्ये त्यांनी वापरलेली थार, इंडीवर आणि बलेनो या गाड्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोठी बातमी! पुण्यात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू

तर या प्रकरणा दरम्यान वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर गौरी गणपतीच्या सणात तिच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या. त्याही आम्ही दिल्या. दीड महिन्यांपूर्वी जावयाने माझ्याकडं दीड लाखांचा मोबाइल मागितला होता. तो देखील मी दिला. वैष्णवी कधीही घरी आली की म्हणायची पप्पा पैसे द्या. साडेसात किलो वजनाची चांदीची ताटं दिली.

मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात माजी मंत्र्यांच्या मुलाला बेड्या; अशी केली हगवणे पिता-पुत्रांची मदत

इतकंच नाही तर 51 तोळे सोनं आणि फॉर्च्यूनर गाडीही जावयाला दिली होती. आधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी दिली होती. वैष्णवी घरी आली की काहीतरी मागत असायची. दीड दोन महिन्यांनी वैष्णवी घरी आली की मी तिला 50 हजार, एक लाख रुपये देत असायचो. असं देखील त्यांनी सांगितलं.

follow us