गांधी-शास्त्रींना भव्य चित्रांद्वारे अनोखी मानवंदना; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

Jadhavar Group of Institutes;गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांना अनोखी मानवंदना दिली.

Gandhi Shastri Jayanti in Jadhavar Group of Institutes Pune

Gandhi Shastri Jayanti in Jadhavar Group of Institutes Pune

Gandhi Shastri Jayanti in Jadhavar Group of Institutes
Pune: पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पुणे यांच्या वतीने 40 बाय 80 फूट आकारातील भव्य चित्रांद्वारे या राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आले.

‘गो ग्यानेश गो’चा नारा; शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, विशाल दादलानींचीही CJP च्या आंदोलनाला हजेरी

नऱ्हे येथील संस्थेच्या प्रांगणात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात तब्बल 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, आठवडाभर परिश्रम घेऊन दोन भव्य चित्रांची निर्मिती केली. ही चित्रे संस्थेतील विद्यार्थिनींनी तयार केली आहेत.

‘भाईला काही येवो अगर न येवो फॅशन सेन्स जबरदस्त आहे’, अभिजित दीपके यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका

संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. राष्ट्रपुरुषांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक नाविन्यपूर्ण प्रयत्न करण्यात आल्याचे ॲड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

Exit mobile version