Gautami Patil on Pune Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून आतापर्यंत या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये हगवणेंशी संबंधित लोकांना देखील याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिला देखील हगवणे कुटुंबाबत विचारण्यात आले. कारण गौतमी हिने पुर्वी एकदा हगवणेंच्या बैलांसमोर आपली कला सादर केली होती. त्यावर एका गाण्याच्या लॉन्चिंगच्या पत्रकारक परिषदेत तिला यावर प्रश्न विचारण्यात आला.
काय म्हणाली गौतमी पाटील?
नृत्या बरोबरच गौतमी पाटील आता अभिनयात देखील आपली कारकीर्द निर्माण करत आहे. त्यात आज गुरूवार 29 मे रोजी गौतमी पाटीलचं नवं गाणं लॉन्च झालं. त्यानिमित्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी तिला हगवणेंच्या बैला समोर डान्स करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेथे तिला त्या लोकांचे वागणे कसे वाटले? तिला कार्यक्रमाचे मानधन मिळाले का? त्यावर गौतमी म्हणाली की, मी कार्यक्रमाला गेले. मला सगळं मानधनही मिळालं. हा व्हिडीओ खूप जुना आहे. पण जेव्हा तो आता व्हायरल झाला. त्यावेळी मला हे प्रकरण समजलं. पण हगवणे प्रकरणाबाबत मला काहीही माहिती नाही. माझी टीम हे सगळ बघते. मी फक्त डान्स करते. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकरणामध्ये मला किंवा कोणत्याही कलाकाराचा संबंध जोडला जाऊ नये. तसेच वैष्णवी हगवणे बाबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे.
ब्रेकिंग : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 1 जूनपासून मंत्रालयात स्वीकारली जाणार नाही कागदी फाईल
दरम्यान या कुटुंबाने बैलासाठी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एप्रिल 2023 मध्ये या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. हगवणे कुटुंबाच्या या कार्यक्रमात स्टेज जवळ फक्त बैल उभा होता आणि स्टेजवर गौतमी पाटील नाचत होती. माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी वैष्णवीचा दीर सुशीन हगवणे याने भला मोठा स्टेज बांधला होता. जिथे गौतमी पाटील नाचत होती. तर तिच्यामागे स्टेजवर सुशील हगवणे यांचा मोठा फोटो आणि नावंही झळकलं होतं. हुंड्यासाठी ज्या घरात दोन्ही सुनांना मारलं जातं होते, त्यांचा धळ करण्यात येत होते त्याच घरात बैलाच्या वाढदिवसाठी चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला जातो हे मात्र विशेष आहे.