रोहित पवारांना काही काम नाही…विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन गिरीश महाजनांची टोलेबाजी!

रोहित पवार यांना काही काम नाही, आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसतात, अशी टोलेबाजी मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावलायं.

Untitle

Untitle

Minister Girish Mahajan On Mla Rohit Pawar : रोहित पवार (Rohit Pawar) यांना काही काम नाही, आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसतात, अशी टोलेबाजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलीयं. दरम्यान, पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये सातत्याने होत असलेले कथित घोटाळ्यांवरुन विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोक केलेले आहेत.

इतकंच वाटतंय तर देशात राहायला या; मोदींचं कौतुक करणाऱ्या NRI महिलेची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला

पुढे बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, देशातला तरुण भाजपसोबत आहे. काही पक्ष राजकीय पोळी भाजण्याचं काम करीत आहेत. त्यांच्यामागे जनाधार नाहीये, त्यांच्यामागे कोणीचं आललं नाहीये, लोकं आमच्या पाठीशी आहे असं दाखवतात. राज्यात आता पुन्हा झेडपी पंचायत सितीच्या निवडणूक आहे. रोहित पवारांना काही काम नाही, आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसतात. परंतू हे असं करुन काहीही होणार नाही. देशाचं भलं कशात आहे हे सर्वांना माहिती असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केला आहे. विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याची माहिती समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या परीक्षेतील 615 उमेदवारांपैकी जवळपास 150 जण ‘मास कॉपी’ करून उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर या कथित गैरप्रकारासंदर्भातील काही पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विभागांतर्गत PSI पदाच्या परीक्षेत 615 पैकी जवळपास 150 जण मास कॉपी करून पास झाल्याची माहिती समोर आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील आरोपी अभिजीत लेंडवे आणि त्याच दर्जाचा आणखी एक अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे आपल्याकडे आल्याचा दावाही पवार यांनी केला आहे. या पुराव्यांचा लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version