इतकंच वाटतंय तर देशात राहायला या; मोदींचं कौतुक करणाऱ्या NRI महिलेची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray मोदींवर टीका करताना त्यांचं कौतुक करणाऱ्या परदेशात राहणाऱ्या भारतीय महिलेची मिमिक्री करत टोला लगावला.

Raj Thackeray

Raj Thackeray takes dig by mimicking NRI woman who praises Modi : ठाण्यातील मनसे मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या काही दिवसांतील विविध घडामोडींवर भाष्य करत सरकारच्या धोरणांवर आणि राजकीय वातावरणावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांचं कौतुक करणाऱ्या परदेशात राहणाऱ्या भारतीय महिलेची मिमिक्री करत टोला लगावला.

रशियाने भारताला दिला मोठा झटका; स्वस्त कच्च्या तेलाची सवलत बंद, चीनसोबत व्यापार तेजीत

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेले की अनेकदा तिथे भारतीय महिलांचा उत्साह पाहायला मिळतो. काही जणी तर मोदींना पाहिल्यानंतर, “मोदीजींना पाहून देवाचे दर्शन झाल्यासारखे वाटले,” अशा भावना व्यक्त करतात. पण जर तुम्हाला देशाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल इतका अभिमान वाटत असेल, तर परदेशात राहण्याऐवजी भारतात परत का येत नाही?

दिल्लीत इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; इमारत मालकावर गुन्हा दाखल

देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे सांगितले जाते, जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के असल्याचा दावा केला जातो आणि भारत इतर अनेक देशांच्या तुलनेत वेगाने प्रगती करत असल्याचे चित्र मांडले जाते. मग इतके सर्व काही चांगले सुरू असेल, तर परदेशात राहण्याची गरज काय? भारतात या आणि इथल्याच विकासाचा भाग बना, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई होणार; एमपीएससी प्रकरणावर विक्रम पाचपुतेंची स्पष्ट भूमिका

त्याचबरोबर यावेळी ठाकरेंनी अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो काढल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादावर बोलताना राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांसारख्या महापुरुषांच्या रांगेत इतर कोणालाही स्थान देता येणार नाही, अशी भूमिका मांडली.

follow us