रशियाने भारताला दिला मोठा झटका; स्वस्त कच्च्या तेलाची सवलत बंद, चीनसोबत व्यापार तेजीत

आता बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला कच्च्या तेलावर दिली जाणारी सूट बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 06T215307.893

Russia deals a major blow to India : रशिया हा भारताचा जुना आणि महत्त्वाचा मित्र मानला जातो. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातल्यानंतरही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवली. या काळात भारताला रशियन कच्चे तेल मोठ्या सवलतीच्या दरात मिळत होते. मात्र आता बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला कच्च्या तेलावर दिली जाणारी सूट बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना रशियन तेलासाठी अधिक किंमत मोजावी लागत आहे.

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष सुरू होण्यापूर्वी रशियाकडून भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीवर मोठी सूट मिळत होती. मात्र संघर्षानंतर जागतिक ऊर्जा बाजारातील परिस्थिती बदलली. स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला तेलाचा पुरवठा सुरू ठेवला असला तरी पूर्वी मिळणारी सवलत बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भारताला रशियन तेलाची खरेदी अधिक दराने करावी लागत आहे.

दुसरीकडे, रशिया आणि चीनमधील व्यापार मात्र वेगाने वाढत आहे. गेल्या तीन दशकांमध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार तब्बल 30 पटीने वाढल्याचे सांगण्यात येत आहे. रशिया-चीन व्यापार आता 200 अब्ज डॉलरच्या पुढे पोहोचला आहे. ऊर्जा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि इतर क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य सातत्याने वाढत आहे.

मोशीत DJ च्या दणदणाटाने कुटुंब त्रस्त; आजारी वडिलांना घर सोडावं लागलं, अखेर मृत्यू, सोसायटीवर गंभीर आरोप

याउलट भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 70 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. त्यामध्येही कच्च्या तेलाचा मोठा वाटा आहे. भारत आणि रशियाने आपला द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारताच्या तुलनेत रशियाचा चीनसोबतचा व्यापार जवळपास तीनपट असल्याचे चित्र आहे.

रशिया आणि चीनमधील वाढत्या व्यापारामुळे दोन्ही देशांमधील संबंधही अधिक मजबूत होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील जवळीकही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रात रशिया आणि चीनची भागीदारी महत्त्वाची ठरत आहे.

दुसरीकडे, भारतासाठी रशियन कच्च्या तेलाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यावर मिळणारी सवलत होती. आता ही सवलत बंद झाल्याने भारतीय तेल कंपन्यांना रशियन तेल खरेदी करताना वाढीव किंमत, वाहतूक खर्च आणि इतर देशांकडून उपलब्ध होणाऱ्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे रशिया-चीनमधील वाढती जवळीक आणि भारताला मिळणाऱ्या रशियन तेलाच्या सवलतीतील बदल या दोन्ही घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.

follow us