Groundbreaking ceremony for customers’ future homes : बाणेर-बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरात विकसित होत असलेल्या ‘ड्रीम वेलमोर’ या प्रीमियम निवासी प्रकल्पाचा ‘स्वप्नांचा शुभारंभ’ हा विशेष भूमिपूजन सोहळा 20 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. या प्रकल्पाने 100 हून अधिक बुकिंगचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून, या निमित्ताने ग्राहकांच्या भावी घरांच्या जागी भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला ड्रीम वे रिअॅल्टी आणि फोरॲसिस इन्फ्रा यांच्या संचालकांसह स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर आणि दिनेश माथवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे घराचा ताबा मिळण्यापूर्वीच रहिवाशांना प्रकल्पातील क्लबहाऊस आणि विविध सुविधांचा अनुभव घेता यावा, यासाठी उपक्रम राबवण्याची घोषणा. घराचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच ग्राहकांना या प्रकल्पातील जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. यावेळी ड्रीम वेलमोर रिअॅल्टीचे श्री. नरसिंह बालवडकर म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वप्नातील घराशी एक भावनिक नातं जोडलेलं असतं. घर मिळेपर्यंत हे नातं तितकंच दृढ आणि जिवंत राहावं, यासाठी आम्ही आमच्या सर्व 100 हून अधिक ग्राहकांच्या जागी भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला.
घर बांधण्याची प्रक्रिया ही केवळ बांधकामापुरती मर्यादित नसून, ग्राहकांच्या स्वप्नांना आकार देण्याची प्रक्रिया आहे. या संपूर्ण प्रवासात ग्राहकांना सहभागी करून घेणं आणि त्यांचा विश्वास जपणं हे आमचं प्राधान्य आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या सोहळ्याचा उद्देश केवळ बुकिंगच्या यशाचा आनंद साजरा करणे एवढाच नव्हता, तर ग्राहकांनी प्रकल्पावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हाही होता. भूमिपूजनासाठी ग्राहकांना विशेष पूजा किट देण्यात आले. तसेच या अविस्मरणीय क्षणांच्या आठवणी जपण्यासाठी छायाचित्रणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
सामायिक 7/12 जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती अनिवार्य, फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
बालेवाडी हाय स्ट्रीट येथे विकसित होत असलेला ‘ड्रीम वेलमोर’ हा सुमारे चार एकर क्षेत्रावर विस्तारलेला प्रीमियम निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात 3 आणि 4 बीएचके सदनिकांचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 4 बीएचके सदनिकांसाठी 22 फूट उंचीची डबल-हाइट लिव्हिंग स्पेस हे एक वैशिष्ट्य असल्याचे प्रेस रिलीजमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पात 60 टक्के मोकळी जागा, 50 हजार चौरस फुटांचे चार मजली क्लबहाऊस, 40 हून अधिक जीवनशैलीविषयक सुविधा आणि क्लबहाऊसला लागून 30 हजार चौरस फुटांचे मैदान अशा सुविधांचा समावेश आहे.
‘स्वप्नांचा शुभारंभ’ या उपक्रमातून ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा ड्रीम वेल रिअॅल्टीचा प्रयत्न दिसून आला. 100 हून अधिक बुकिंगचा टप्पा पार करताना ग्राहकांचा विश्वास, सहभाग आणि समाधान यांना प्राधान्य देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ग्राहकांच्या जागी करण्यात आलेल्या भूमिपूजनापासून ते घराचा ताबा मिळण्यापूर्वीच प्रकल्पातील सुविधांचा अनुभव देण्याच्या नियोजनापर्यंत, ग्राहकांना केवळ घर नव्हे तर संपूर्ण जीवनशैलीचा अनुभव देण्याची संकल्पना या उपक्रमातून अधोरेखित झाली.
