‘ड्रीम वेलमोर’चा ‘सपनों का शुभारंभ’ विशेष भूमिपूजन, 100 हून अधिक बुकिंगचा टप्पा पार, ग्राहकांच्या घरांचे भूमिपूजन
सोहळ्याला ड्रीम वेल रिअल्टर्स आणि फोरअॅक्सिस इन्फ्रा संचालकांसह स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर आणि दिनेश माथवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Groundbreaking ceremony for customers’ future homes : बालेवाडी हाय स्ट्रीट येथील ड्रीम वर्क्स रिअल्टर्सच्या प्रीमियम निवासी प्रकल्प ‘ड्रीम वेलमोर’चा ‘सपनों का शुभारंभ’ हा विशेष भूमिपूजन सोहळा 20 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. प्रकल्पाने 100 हून अधिक बुकिंगचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्राहकांच्या हस्ते त्यांच्या भावी घराच्या जागी भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ड्रीम वर्क्स रिअल्टर्स आणि फोरअॅक्सिस इन्फ्रा यांचे संचालक, तसेच स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर आणि दिनेश माथवड यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे घराचा ताबा मिळण्यापूर्वीच रहिवाशांना ‘क्लब वेलमोर’ आणि तेथील विविध सुविधांचा अनुभव घेता यावा, यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची घोषणा. ग्राहकांना घराचा ताबा मिळण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच प्रकल्पातील जीवनशैलीचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
यावेळी ड्रीम वर्क्स रिअल्टर्सचे नरेंद्र बालवडकर म्हणाले, प्रत्येकाचे आपल्या घराशी एक भावनिक नातं जोडलेलं असतं. घर मिळेपर्यंत हे नातं तितकंच दृढ आणि जिवंत राहावं, यासाठीच आम्ही आमच्या सर्व 100 ग्राहकांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला. घर बांधण्याची प्रक्रिया ही केवळ बांधकामापुरती मर्यादित नसते, तर ती ग्राहकांच्या स्वप्नांना आकार देण्याची प्रक्रिया असते. या संपूर्ण प्रवासात ग्राहकांना सहभागी करून घेणं आणि त्यांचा विश्वास जपणं हे आमचं प्राधान्य आहे.
जपानमध्ये भारतीय पॅरा-जलतरणपटूला अटक, हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या सोहळ्याचा उद्देश केवळ प्रकल्पाच्या यशाचा आनंद साजरा करणे एवढाच नव्हता, तर ग्राहकांनी ड्रीम वेलमोरवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हाही होता. यावेळी ग्राहकांना भूमिपूजनासाठी आवश्यक साहित्य असलेले विशेष पूजा किट देण्यात आले. तसेच, या संस्मरणीय क्षणांच्या आठवणी जपण्यासाठी छायाचित्रणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
बालेवाडी हाय स्ट्रीट येथे विकसित होत असलेला ड्रीम वेलमोर हा चार एकर क्षेत्रावर विस्तारलेला प्रीमियम निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात तीन आणि चार बीएचकेची आलिशान घरे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, चार बीएचके सदनिकांमधील लिव्हिंग रूमची उंची 22 फूट असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकल्पात 60 टक्के मोकळी जागा, 50 हजार चौरस फुटांचे चार मजली क्लब हाऊस, 40 हून अधिक लाइफस्टाइल सुविधा आणि प्रकल्पाला लागून असलेले 30 हजार चौरस फुटांचे मैदान अशा विविध वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेसाठी 11 जागा बिनविरोध; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात, विखे-थोरात, लंके व प्रा. शिंदेंचे स्वतंत्र पॅनेल
100 हून अधिक बुकिंगचा टप्पा पार करताना ग्राहकांचा विश्वास, सहभाग आणि समाधान यांना प्राधान्य देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ग्राहकांच्या हस्ते करण्यात आलेले भूमिपूजन आणि घराचा ताबा मिळण्यापूर्वी क्लब वेलमोरच्या सुविधांचा अनुभव देण्याचे नियोजन, या उपक्रमातून ग्राहकांना केवळ घर नव्हे, तर संपूर्ण जीवनशैलीचा अनुभव देण्याचा कंपनीचा दृष्टिकोन अधोरेखित झाला.‘सपनों का शुभारंभ’ हा सोहळा नव्या घरांच्या प्रवासाची सुरुवात ठरण्यासोबतच ग्राहकांशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा आणि नव्या समुदायाच्या निर्मितीचा उत्सव ठरला.