Download App

जुना शिरस्ता कायम ठेवत अजितदादा अॅक्शन मोडमध्ये; ‘पालकमंत्री’ तब्बल 8 तास घेणार झाडाझडती

पुणे : पालकमंत्री म्हणून शुक्रवारचा दिवस पुणे जिल्ह्यासाठी अन् शनिवारचा दिवस बारामती मतदारसंघासाठी हा आपला जुना शिरस्ता कायम ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर आज (शुक्रवार) प्रथमच पुण्यात येत आहेत. आज दिवसभर ते शासकीय विश्रामगृहात पुण्यातील विविध विकासकामांबाबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सलग आठ तास बैठका घेणार आहेत. (Guardian Minister Ajit Pawar is going to hold meetings for eight consecutive hours regarding various development works in Pune)

गत आठवड्यात शिंदे सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले. यात चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत. यात ते दिवसभर बैठका घेणार आहेत. या बैठकांत पालकमंत्री पवार यांच्याकडून झाडाझडती होण्याची शक्यता गृहीत धरून गुरुवारी दिवसभर अधिकारी आवश्यक माहिती गोळा करण्यात व्यस्त होते.

सुप्रिया सुळे, अजितदादांबद्दलचं वादग्रस्त विधान पडळकरांना पडणार महागात; बजावली कायदेशीर नोटीस

अशा असणार बैठका :

सकाळी दहा वाजता महावितरणच्या प्रश्नांबाबत महावितरणचे मुख्य अभियंता यांच्यासमवेत बैठक होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा ते आढावा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ससूनच्या प्रवेशद्वारात अमली पदार्थ सापडले होते. शिवाय अमली पदार्थ विक्रीतील प्रमुख आरोपी ललित पाटील फरार झाला होता. या पार्श्वभूमीवर ससूनचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

यानंतर जिल्हा परिषदेकडील जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर साडेबारा वाजता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. दुपारी दीड वाजता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुण्यातील विविध शासकीय इमारतींच्या बांधकामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

‘ससून’ ड्रग्ज रॅकेटप्रकरण: अखेर सरकारला आली जाग, चौकशीसाठी समिती नेमली

महाराणी सईबाई स्मृतिस्थळ स्मारक विकास आराखड्याची बैठक दुपारी साडेचारला होणार असून, त्यानंतर चाकण नगर परिषद विकास आराखड्यावर चर्चा केली जाणार आहे. सायंकाळी सहाला कात्रज दूध संघाचा आढावा ते घेणार आहेत.

Tags

follow us