सुप्रिया सुळे, अजितदादांबद्दलचं वादग्रस्त विधान पडळकरांना पडणार महागात; बजावली कायदेशीर नोटीस

सुप्रिया सुळे, अजितदादांबद्दलचं वादग्रस्त विधान पडळकरांना पडणार महागात; बजावली कायदेशीर नोटीस

Gopichand Padalkar controversial statement : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजितदादा गटाने राज्यभर आंदोलनं केली. त्यातच आता बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव (Nitin Yadav)यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सात दिवसात माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार राहा अशी नोटीस पाठवली आहे.

नगरमध्ये शाळेच्या परिसरातच मटक्याचा अड्डा! काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलिसांची कारवाई

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ॲड.असीम सरोदे व ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. अवंती जायले यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये सात दिवसात लेखी माफी न मागितल्यास गोपीचंद पडळकर यांना न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे.

Farzi 2 : पुन्हा एकदा बनावट नोटांचा कारखाना? फर्जी 2 साठी शाहीद कपूर सज्ज

नोटीसबद्दल नितीन यादव म्हणाले की, पवार कुटुंबियांच्या विरोधात वेळोवेळी जाणूनबूजून बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी सात दिवसात शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागावी.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कायदेतज्ज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्यावतीने नोटीस बजावली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांची स्वतंत्रपणे लेखी माफी न मागितल्यास आमदार पडळकर यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?
धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाबद्दल अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजितदादा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या. लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आमचे लोक हुशार झाले आहेत, अशा खोचक शब्दांमध्ये आमदार पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube