Guardian Minister Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीस यांची आपल्या कार्यकर्त्यांवर चांगली पकड ही असते. मात्र त्यांच्याशी बोलताना अनेकदा धाकधूक होते व बोलता बोलता बीपी कमी – जास्त होतो, असे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले, फडणवीस हे बीपी वाढवणारे व कमी करणारे नाहीत तर ते माणसाचं योग्य मूल्यमापन करणारे, योग्यवेळेला प्रेम करणे, रागवणे, समजावणे तसेच योग्यवेळेला माणसाला मोठे करणारे व त्यांना त्यांची जागा दाखवणारे आहे, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. तसेच फडणवीस हे कार्यकर्त्यांचे मूल्यमापन करणारे आहे. अशा शब्दात पाटील यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली.
उदय सांमत म्हणाले… जो सन्मान पवारांना दिला जातो तोच उद्धव ठाकरेंना दिला जावा
पुण्यात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे वर्ष प्रामुख्याने निवडणुकांचे आहे. मी काय भविष्यकार नाही मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला की एकापाठोपाठ एक नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या यांच्या निवडणूका या जाहीर होतील. त्यानंतर न चुकणाऱ्या विधानसभा व लोकसभा या निवडणुका देखील पार पडतील. खऱ्या अर्थाने हे वर्ष हे निवडणुकांचे आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
मुळीक यांनी सांगितला फडणवीसांचा तो किस्सा
भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांसोबतचा एका किस्सा सांगितला. आपण एकदा फडणवीसांना भेटण्यासाठी मुंबईत गेलो मात्र त्यांच्याशी बोलताना गडबड झाली व ते चिडले. मात्र त्यांनतर मला अस्वस्थ झाले व मी दवाखान्यात गेलो असता माझा बीपी हाय झाला. मात्र फडणवीस हे पुण्यात आले तेव्हा मी त्यांना भेटून सगळं काही सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर हात देत म्हणाले चिंता करू नको, माझा उद्देश तसा नव्हता असं म्हंटल्यावर मला ठीक वाटू लागले व माझा बीपी व्यवस्थित झाला.
गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल… जाणून घ्या प्रकरण
पाटलांनी सांगितला सोमय्यांवरील हल्ल्याचा किस्सा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. हे सांगत असताना पाटील म्हणाले, अशा पद्धतीने एका माजी खासदारावर दिवसाढवळ्या हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतरआपल्या नेत्यासाठी पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे बाहेर पडले. त्यांनी आंदोलन केले, पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विरोधी पक्षात काम करणे हे मुळीक यांच्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र तरी मुळीक यांनी हे काम प्रभावीपणे केले.