Download App

सचिन तेंडुलकर मुख्यमंत्री व्हावा म्हणून ‘त्याने’ कसलीय कंबर…

मुंबई : जगभरात प्रसिद्ध खेळाडू आणि काही कलाकारांचे अनेक चाहते पाहायला मिळतात. आपल्या क्रिकेटच्या पंढरीतील क्रिकेटचे भक्त आपल्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात. पाकिस्तानचे पंतप्रधान पद भूषविणारे क्रिकेटपटू इम्रान खान हे सुध्दा त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या दक्षिणात्य राज्यात चित्रपट अभिनेते तर राजकरणात सुद्धा तितक्याच पद्धतीने सक्रिय आहेत.

याचाच एक भाग म्हणून पुण्यातील एका सचिनच्या चाहत्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सचिन तेंडुलकर असावा अशी मागणी केलीय. पुण्यातील येरवडा भागातील मध्यवर्ती ठिकाणी विनोद मोरे यांचा मलई गोळा विकण्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे गेले तीस वर्षे तो आणि त्याचे कुटुंब या व्यवसायात आहेत. तसे पाहिले तर विनोद मोरे हे सचिनचे चाहते म्हणून परिसरात लोकप्रिय आहे.

गेल्या काही वर्षापासून त्यांनी आपल्या दुकानाचे नाव देखील सचिनस् मालाई गोळा असे ठेवले आहे. दुकानात त्यांनी सचिनचे लहानपणापासून ते आत्ताच्या कारकिर्दीचे सगळ्या फोटोंची लायब्ररी तयार केली आहे .दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना या ही लायब्ररी कडे पाहून भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. विनोद मोरे यांनी एक जन मोहीम सुरू केली आहे. की सचिन तेंडुलकर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी कल्पना त्यांना सुचली आणि त्याबद्दलची जनस्वाक्षरी मोहीम राबवण्यास सुरू केलीय.

Nilesh Rane : बिष्णाईकडून राऊतांना धमकी; राणेंकडून जावयाचा उल्लेख करत ट्विट

त्यांच्या कडे येणारा प्रत्येक ग्राहक या मोहिमेचे कौतुक करत आहे आणि सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री बनावे अशी अनेक लोकांची पसंती आहे असे विनोद मोरे यांनी सांगितले. शेवटी जनमत अधिक महत्वाचे असते. “सामान्य माणसाने एखाद नाव सुचवले तर अशक्य आणि तेच जर वजनदार वेक्तीने सुचवले तर मास्टर स्ट्रोक” असे का असते..? विनोद मोरे सांगतात.

Tags

follow us