Download App

पुण्यात अतिमुसळधार! रेड अलर्टनंतर आज पुण्यातील शाळांना सुट्टी; राज्यातही जोर’धार’

पुण्यात जोरदार पाऊस होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Pune Rains : राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार (Pune Rains) पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. राज्याची राजधानी मुंबईतही पावसाने (Mumbai Rains) जोर धरला आहे. पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या (Heavy Rainfall) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

Maharashtra Weather : राज्यात पुढील 5 दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील खडकवासला भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागातील शाळा आज गुरुवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यात पुढील 48 तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यालाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण भागातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहरालाही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे शहरात पुढील 48 तासांत जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Video: जामखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; मोहरी तलाव ओव्हर फ्लो, कुठ किती झाली नोंद?

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मात्र तुरळक पावसाचा अंदाज आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, बीड आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुण्यात पावसाचा जोर जास्त आहे. खडकवासला धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पुढील काही तासांत पुणे शहर आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

follow us