Hindi-Marathi dispute In Pune : ठाण्यानंतर आता पुण्यात देखील हिंदी-मराठी वाद पेटल्याचं समोर (Hindi Marathi dispute) आलंय. मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना (Pune News) घडली. मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या एअरटेल टिम लीडरला मनसे (MNS) स्टाईल चोप दिलाय. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोललं तर कामावरून काढून टाकेल असं टीम लीडरकडून धमकावलं जात होतं.
महायुतीमधील शीतयुद्ध संपुष्टात; तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?, संभाव्य यादी आली समोर
तसेच हिंदू सणांना सुट्टी न देणे, गेले 3 महिने मराठी पोरांचा पगार केला नसल्याचं देखील समोर आलंय. त्यानंतर मराठी कामगारांनी मनसेकडे तक्रार केली की, आमचा पगार थांबवला आहे. शाहबाज अहमदने कौनसी भी सेना लेके आओ, ( MNS Activist beat up Airtel employee) नही बोलता मराठी. कामावरून काढून टाकतो. बघू कोण येतंय? अशी धमकी मराठी पोरांना दिली होती.
या मराठी पोरांवरील अन्यायाला आज मनसे स्टाईल वाचा फोडली. येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत. अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील 3 एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा अंतिम इशारा मनसेकडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्य टीम लीडरला पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी धू धू धुतलेय.
रोहितने माघार घेतली की त्याला बाहेर काढलं? उत्तर देत स्वतःच केला खुलासा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुंबई, ठाणे अन् पुणे या शहरामध्ये हिंदी-मराठी वाद तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंब्र्यात फळ विक्रेत्यासोबत झालेल्या वादातून मराठी तरूणाला माफी मागायला लावली होती, या संतापजनक घटनेचे पडसाद अजून तीव्र आहेत. तेच पुण्यात देखील धक्कादायक घटना घडलीय. वाकडेवाडी येथील एअरटेल कंपनीच्या कार्यालयामध्ये हा प्रकार घडलाय.
हिंदी-मराठी भाषा वाद पेटताना दिसतोय. ठाण्यात मुंब्रा येथील एक मराठी तरुण आणि फळ विक्रेत्याच्या वादाची घटना ताजी आहे, तेच आता पुण्यात देखील धक्कादायक प्रकार घडलाय. या वादामध्ये आता मनसेने देखील उडी घेतलीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला पुण्यात चांगलाच चोप दिलाय.