पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावाने बोंब मारत तसेच ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत होळी सण साजरा केला. तसेच वाढत्या महागाई मुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी यावेळी घरगुती गॅस सिलिंडरची (Gas Cylinder) प्रतिकृती तयार करून ती पेटवण्यात आली.
मनमोहक विविध रंगांची उधळण करत… साथीला बच्चे कंपनीचा डफलीचा वाजवण्याचा उत्साह… आणि ‘होली है…’च्या गजरात पुणे शहर तसेच जिल्ह्यात अवकाळी पावासात नागरिकांनी घरोघरी तसेच चौकचौकात होळीचे धडक्यात पूजन केले.
सोमवारी सकाळपासून लहानग्यांनी फुगे, पिशव्या, पिचकाऱ्यात रंग भरून मारणे सुरू केले होते. ‘बुरा न मानो होली है…’ म्हणत एकमेकांना रंगवले जात होते. शहरात ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा करून त्या पेटविण्यात आल्या. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे होळी पेटवली जाते तिथे विशेष गर्दी झाली होती. मोठ्या सोसायट्यासह चौकचौकात मोठमोठ्या होळ्या पेटवण्यात आल्या होत्या.
PM Narendra Modi यांना लिहिलेल्या पत्रात पहिली सही माझी, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
शहर आणि उपनगरात होळी सणाच्या दिवशी मनातील राग आरोळ्या मारून काढला तर ग्रामीण भागात बोंब मारून राग व्यक्त करण्यात आला. तसेच एखाद्याच्या नावाने शिमगा करणे असे देखील या होळीच्या निमित्ताने केले जात आहे.
हवामान विभागाने रविवारीपासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे सोमवारी सकाळपासून शहर आणि उपनगरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याने नागरिक उकड्याने त्रस्त झाले होते. साधारणपणे सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान होळी पेटवण्याच्या वेळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, भरपावसात नागरिकांनी धडक्यात उत्साहात होळी पेटवली आणि बच्चे कंपनीसह आरोळी दिली.