Download App

Kasba – Chinchwad पोटनिवडणुकांसाठी गृहमंत्री Amit Shah उतरले मैदानात

  • Written By: Last Updated:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कसबा – चिंचवड निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. यातच निवडणुका बिनविरोधासाठी भाजपकडून आवाहन करण्यात आली मात्र इतर पक्ष निवडणुकांवर ठाम आहे. यातच आता या निवडणुकांसाठी खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे देखील आता मैदानात उतरले आहे. यामुळे या निवडणुका चांगल्याच गाजणार असे दिसते आहे.

येत्या 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पुणे दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून निवडणुकीसाठीच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची चर्चाही सुरू झाली आहे. दरम्यान भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार असल्याने या निवडणुकीद्वारे भाजप आपले शक्तिप्रदर्शन देखील करत आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका बिनविरोध करण्याचे भाजप नेत्यांचे आवाहन महाविकास आघाडीने धुडकावत उमेदवार दिले आहेत.

यातच विधानपरिषदेत झालेल्या पराभव पाहता भाजपने या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. तर दुसरीकडे पोटनिवडणूक जिंकण्याचा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान,कसबा मतदारसंघात काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने टिळक कुटुंबाला डावलल्यामुळे पक्षाला फटका बसू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक परिवाराशी संवाद साधला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गृहमंत्री शहा 18 आणि 19 फेब्रुवारीला पुण्यात आहेत. शहा यांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर 19 फेब्रुवारी रोजी अमित शहा बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.

Tags

follow us