Download App

Honey Trap Case : DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची रवानगी थेट येरवड्यात…

हनीट्रॅप प्रकरणात अडकल्यानंतर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे.

एटीएसकडून कुरुलकरवर हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना एटीएसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Shubman Gill : 4 महिन्यात 6 शतकं… शुभमन गिलचे वादळ World Cup मध्येही घोंगावणार?

प्रदीप कुरुलकरला कालही न्यायालयात हजर करण्यात आले होते, कालही त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. कुरुलकरांना काल 1 दिवसांची एटीएस कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यानंतर आता आज न्यायालयात हजर केले असता कुरुलकरची रवानगी येरवडा जेलमध्ये करम्यात आली आहे. 29 मेपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रस्त्यावर धावणाऱ्या बसची दोन्ही चाकं अचानक निखळली, बसमध्ये होते 35 प्रवासी

हनीट्रॅप प्रकरणात डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांनंतर आता एक अधिकारी अडकल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सचा एक अधिकारीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत.

हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर कुरुलकरांनी पाकिस्तानला संवेदनशीर माहिती पुरवल्याचा आरोप एटीएसकडून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशी सुरु असातानाच आता एअरफोर्सचे अधिकारी निखिल शेंडे यांच्याोबतही पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचा संपर्क झाल्याची माहिती समोर आलीय.

Ahmednagar Voilence : हिंसाचाराच्या निषेधार्थ शेवगावमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद

Tags

follow us