Download App

नाशिकनंतर पुण्यातही खळबळ! गिरीश महाजनांचे विश्वासू प्रफुल लोढा अडचणीत; आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

Praful Lodha New Assault Case : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणात मुख्य आरोपी असलेला प्रफुल लोढा (Praful Lodha) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधीच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी (Pune Crime) मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या लोढावर आता पिंपरी-चिंचवड पोलिस हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा (Assault Case) दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

बावधन पोलीस ठाण्यात नवा गुन्हा

ही नवी तक्रार 17 जुलै 2025 रोजी दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड (Pune Police) भागात राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने ही तक्रार केली. तिच्या म्हणण्यानुसार, प्रफुल लोढाने तिला आणि तिच्या पतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवले. या निमित्ताने 27 मे 2025 रोजी रात्री आठच्या सुमारास बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये भेट घेण्यास बोलावले.

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला धक्का; शहरप्रमुख काळेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांनी केली अटक

महिलेच्या आरोपानुसार, त्या ठिकाणी लोढाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा अट मांडत दबाव टाकला. जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा त्याने तिचीही नोकरी घालवण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने बलात्कार केला. याबाबत महिलेने स्पष्टपणे तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांकडून गुप्ततेवरून संशय

या प्रकरणात विशेष म्हणजे गुन्हा 17 जुलै रोजी नोंदवूनही त्याची माहिती बाहेर आली नव्हती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात मोठी गोपनीयता पाळल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या गुप्ततेमागे नेमकं काय कारण आहे, याची चर्चा राजकीय आणि पोलिस वर्तुळात सुरू आहे. प्रफुल लोढा याच्यावर याआधी मुंबईतही हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप दाखल झाले आहेत. त्याच प्रकरणात सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस लवकरच त्याचा ताबा मागवण्याची शक्यता आहे, जेणेकरून बावधन येथील प्रकरणात अधिक चौकशी करता येईल.

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? तिजोरीत भीषण खडखडाट, 23 अब्ज डॉलर्सचं कर्ज न फेडल्यास…

अडचणींमध्ये सातत्याने वाढ

प्रफुल लोढावर एकामागोमाग एक गंभीर गुन्हे दाखल होत चालल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही माहिती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांच्या पारदर्शकतेबाबत सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

 

follow us