Horrific accident near Khed Shivapur Toll Couple on two-wheeler dies on the spot hit by gas tanker Angry citizens vandalize tanker : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
निदा खान प्रकरणात आला मोठा ट्विस्ट, कोठडीआधी कोर्टात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी (पुणे) येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) व सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दुचाकी क्रमांक एमएच १२ एफएच ४६९६ वरून साताऱ्याकडे जात होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील सातारा लेनवर आले असता गॅस टँकर क्रमांक एपी ०३ टीई ५७५९ याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही टँकरखाली ओढले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
‘आता आयटम साँग करणार नाही’; ‘सरके चुनर’ वादावर नोरा फतेहीचा माफीनामा
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकर आणि दुचाकी दोन्ही वाहने वेगात होती. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला दूरपर्यंत फेकली गेली होती.
सलमान खानचा बॉबी देओलला पाठिंबा! ‘बंदर’चा टीझर शेअर करत चाहत्यांना आवाहन
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मात्र, गंभीर दुखापतींमुळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. संतप्त नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा आर्थिक क्षेत्रातही रेकॉर्ड, बिहार अन् झारखंड राज्यात नवा विक्रम
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
