Download App

पुण्यातून पळालेला ललित पाटील मुंबई पोलिसांना कसा सापडला? वाचा इनसाईड स्टोरी

Lalit Patil Arrest : मुंबई : फरार ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित पाटील राज्यभरात चर्चेत आला होता. त्यावरुन मोठे राजकारण पाहायला मिळाले. विरोधकांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेर मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला अटक केली आहे. मात्र पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळालेला आरोपी मुंबई पोलिसांना कसा सापडला? या प्रकरणात मुंबई पोलिसांची कशी एन्ट्री झाली? असे सवाल आता उपस्थित होत आहे. (How did Mumbai police find Lalit Patil who escaped from Pune, Read the inside story)

10 हजारांच्या ड्रग्जमुळे सापडला ललित पाटील :

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि साकीनाका पोलिसांच्या डिटेक्शन टीमच्या स्टाफने ललित पाटीलच्या अटकेत मोठी भूमिका बजावली. एका दहा हजार रुपयांच्या ड्रग्जमुळे पोलिसांना ललित पाटीलविषयी माहिती समजली. काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांच्या डिटेक्शन पथकाने दहा हजार रुपयांचे ड्रग्ज विकताना एका विक्रेत्याला अटक केली होती.

Lalit Patil Arrested : …अशी मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ ललित पाटीलच्या आई-वडीलांना अश्रु अनावर

पोलिसांना चौकशीदरम्यान, हा व्यक्ती ललित पाटीलच्या नेटवर्कमधील असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे नाव सार्वजनिक केले नाही. याच व्यक्तीकडून पोलिसांना नाशिकमधील 300 कोटींच्या फॅक्टरीबद्दल माहिती समजली. पोलिसांनी स्वतः नाशिकमध्ये जाऊन ती फॅक्टरी उद्ध्वस्त केली. ही बातमी वाचल्यानंतर ललित पाटील काही जणांना संपर्क करण्याचा प्रयत्न करणार याची पोलिसांना खात्री होती.

पोलिसांनी या खात्रीवर काम सुरु केले. त्यांनी अटक केलेल्या व्यक्तीला कस्टडीमध्ये ठेवले आणि भासवले की तो बाहेर आहे. ललित पाटीलने अखेर त्याला संपर्क केलाच. तो ललितला भेटायला येण्याबद्दल विचारत होता. त्यावर ललितने सहमती दर्शविली आणि त्याला लोकेशन सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ललित पाटीलला चेन्नईमधून अटक केली. याच कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं; अटकेनंतर ललित पाटीलच्या दाव्यानं खळबळ

पुण्यातून असा केला ललितने प्रवास :

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून पळून गेल्यानंतर ललित पाटील आधी नाशिकला गेला. तिथे तो काही दिवस थांबला. तिथून तो इंदौरला गेला. तिथून सुरतला गेला. सुरतवरुन धुळे मार्गे तो पुन्हा नाशिकला आला. इथून तो छत्रपती संभाजीनगरला गेला. तिकडून तो बंगळुरु मार्गे चेन्नईला निघाला होता. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Tags

follow us