Download App

Pune : चांदणी चौकाचं नाव कसं पडलं? पाढा वाचत अजितदादांनी गडकरींसमोर ठेवला इतिहास

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे उपस्थितांना एकप्रकारे पर्वणीच असते. अजितदादा त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांना परिचित आहे. आजही चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कार्यक्रमावेळी याचा अनुभव पुणेकरांना आला. यावेळी अजितदादांनी सध्या सुरू असलेल्या विविध गोष्टी आणि छापून येणाऱ्या बातम्यांवरही परखड भाष्य केले. यावेळी त्यांनी चांदणी चौकाला नाव कसं पडलं याचा इतिहास सांगत पुणेकरांच्या ज्ञानात भर टाकली.

शिंदेंची नाराजी, CM पदावर डोळा अन् 40 रूपयांच्या टाळ्या; अजितदादांनी गाजवला चांदणी चौक

अजितदादा म्हणाले की, या चौकाचं नाव पालिकेच्या दप्तरी NDA चौक असे आहे. मात्र, तरी सुरूवातीपासून या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखले जाते. हे सांगताना अजितदादा म्हणाले की, या ठिकाणी असलेली काही मंडळी सांगतात की, जुन्या पुलावर चांदणी कोरलेली होती. त्यामुळे या चौकाला चांदणी चौक असे नाव पडलं असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आता बऱ्याचा दगडांवर बरीच नावं कोरलेली असतात, हार्ट काढलेला असतो. बाण काढलेला असतो मग त्याला कुठलं नाव द्यावं असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित करत पुणेकर कोणत्याही गोष्टीवर नाव ठेवायला मागे पुढे बघत नाहीत असे म्हणत जगामध्ये आपल्या पाट्या गाजल्याचं अजित पवार म्हणाले.

ब्रिटीश कायदा रद्द, पण त्यांच्यापेक्षा भयंकर… संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

 

गडकरी साहेब आम्ही देवांनादेखील सोडलेलं नाही

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, गडकरी साहेब आम्ही देवानादेखील सोडलेले नाहीये असे म्हणत आमच्या पुण्यातील देवांचीच नावं बघा असे सांगत अजितदादांनी विविध नावांचा पाढाचं वाचण्यास सुरूवात केली. यात त्यांनी निवडुंग्या विठोबा, पासोड्या विठोबा, जिलभ्या मारूती, खुन्या मारूती, दाढीवाला दत्त, सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा, गुढगे मोडी माता, भाजीराम मंदीर, माती गणपती, मोदी गणपती, गुपचूप गणपती, गुंडाचा गणपती अशी अनेक नावे घेत आम्ही पुणेकर त्यातही मागे नसल्याचे जाहीर केले.

मात्र, कुणालाही नावे ठेवली तरी पुणेकर प्रत्येकावर मनापासून प्रेमदेखील करतो असे सांगत सर्व पुणेकरांचे या चांदणी चौकावर मनापासून प्रेम असल्याचे अजितदादांनी सांगून टाकलं. तसेच आमचं गडकरी साहेब तुमच्यावर आणि फडणवीस साहेबांवरही भरपूर प्रेम असल्याचे सांगितले. तसेच गडकरी आणि फडणवीस यांनी नागपूर पेक्षा पुण्याला आधी मेट्रो द्यायला हवी होती, आम्ही खचाखच भरून चालवली असती. पण हरकत नाही… देर आये दुरुस्त आये… असे म्हणत नाराजीदेखील बोलून दाखवली.

Tags

follow us