कसब्याची मला स्वतःला खात्री नव्हती, शरद पवारांचं मोठं विधान

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील (Kasba)विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतलीय. पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमंशी संवाद साधला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar)यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी पवार म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या रुपानं यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला […]

Sharad Pawar 1

Sharad Pawar 1

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील (Kasba)विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतलीय. पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमंशी संवाद साधला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar)यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी पवार म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या रुपानं यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं पण मला स्वतःला त्याची खात्री नव्हती असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

तो अनेक वर्ष भाजपचा गड आहे असं म्हटलं जात होतं. दुसरी गोष्ट अशी की तिथं अनेक वर्ष गिरीष बापटांनी लक्ष केंद्रीत केलेलं आहे. बापट हे स्वतः सतत लोकांचे प्रश्न सोडवले. बापटांचं वैशिष्ट्य हे होतं की भाजपशिवाय इतरांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळं साहजिकच त्यांचं लक्ष ज्या ठिकाणी आधीच केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असं वाटत होतं.

आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार; रुग्णालयात डॉक्टर-नर्स सुट्टीवर, आईनंच केली प्रसूती

शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की बापटांना डावलून किंवा टिळकांना डावलून काही निर्णय घेतले अशी चर्चा होती, त्याचा काही फायदा होईल अशी एक शंका होती पण निवडणूक झाल्यानंतर मी माहिती घेतली त्याच्यामध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची, जी व्यक्ती लोकांनी निवडून दिली ती व्यक्ती वर्षानुवर्ष सर्वसामान्य लोकांसाठी कशाचीही अपेक्षा न करता काम करणारी होती. आणि आणखी एक वैशिष्ट माझी काही तशी त्यांची फार जूनी ओळख नाही, पण तसा त्यांचा बारामतीशी संबंध आहे.

एक गोष्ट लोकांनी माझ्या लक्षात आणून दिली की ती म्हणजे उमेदवार असा आहे की, हा कधी चारचाकीत बसत नाही हा कायम दोनचाकीवालाच आहे. त्यामुळं दोन पाय असणारे जे मतदार आहेत, त्या सगळ्यांचं लक्ष याच्याकडं आहे आणि त्याचा फायदा होईल असं ऐकायला मिळालं ते 100 टक्के खरं ठरलं. महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा पाठिंबा मिळाल्यानंच आम्हाला हे यश मिळालंय, असं आमचं निरीक्षण आहे, असंही शरद पवार यांनी सांगितल.

Exit mobile version