Download App

उद्योजक पुनीत बालन यांच्यावर महापालिकेची कारवाई; जाहिरातीप्रकरणी तब्बल तीन कोटींचा दंड

  • Written By: Last Updated:

पुणे: उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर पुणे महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) कारवाई केली आहे. दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महानगरपालिकने बालन यांना नोटीस काढली आहे. बालन यांना तब्बल तीन कोटी 20 लाख रुपये दंड जमा करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत.

गेल्या महिन्यात पुण्यात जोरदारपणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. या उत्सवात पुनीत बालन यांच्या ऑक्सिरिच कंपनीचे जाहिरात फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. हे फलक सार्वजनिक जागांवर लावण्यात आले होते. पालिकेने केलेल्या पाहणीत तब्बल अडीच हजार जाहिराती लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. जाहिरात फलक हे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लावण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. या जाहिरातींमुळे विद्रुपीकरण झाले आहे.

अजितदादांचे इजा, बिजा, तिजा… : नाराजी लक्षात येताच शिंदे-फडणवीस दिल्लीला रवाना

त्यामुळे पालिकेचे परवानगा व आकाचिन्ह विभागाचे उपआयुक्त माधव जगताप यांनी बालन यांना नोटीस काढली आहे. मंगळवारीच ही नोटीस काढण्यात आली आहे. अनधिकृत जाहिरात फलकांचे 80 हजार चौरस फुटांचे चाळीस रुपये प्रतिदिन चौरस फुटाप्रमाणे दहा दिवसांचा 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड बालन यांना करण्यात आला आहे.

Lahore 1947: सनी पाजी अन् आमिर खान आले एकत्र; दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत 

हा दंड येत्या दोन दिवसाच्या आत पुणे महानगरपालिकेच्या कोषागरात भरायचा आहे. या दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. वसुलीची रक्कम आपल्या मिळकत करातून वसूल केली जाईल, असेही पालिकेच्या नोटीशीमध्ये म्हटले आहे.

गणेशोत्सवातील जाहिरातीतून वगळले
महानगरपालिकेच्या नियमानुसार सण उत्सव काळामध्ये गणेश उत्सव वगळता सर्व जाहिराती या परवानगी घेईन लावाव्या लागतात. त्यासाठी जाहिरात फलकांचे शुल्क महानगरपालिकेला भरावे लागते. गणेशोत्सवामध्येही बालन यांच्या कंपनीकडून शहरभर जाहिराती लावण्यात आल्या होत्या. परंतु याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही.

पुनीत बालन हे प्रसिद्ध उद्योगपती आहे. बालन हे पुण्यातील सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळाला ते आर्थिक मदत करतात. तसेच सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. अनेक गरजूंना ते आर्थिक मदतही करत असतात.

Tags

follow us