पुणे: शहरातील खडकी (Pune Crime) येथे मातृत्वाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. प्रियाकरासोबत असताना तीन वर्षाची मुलगी रडायची म्हणून मुलीची हत्या करण्यात आलीय. प्रियाकरासोबत (relationship) पळून गेलेल्या आईच्या या कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. खडकी स्टेशनजवळ (Khadki Station) सापडलेल्या मुलीच्या मृतदेहावरुन पुणे पोलिसांना (Pune Police) या सगळ्या प्रकरणाचा तपास लावला आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, संशयीत आरोपी फिरत असताना त्यांच्याकडे असलेली शॉल आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी बालिका एकसारखे वाटले. मृतदेह गुंडाळून अंगावरुन घेऊन जातात त्याप्रमाणे तो शॉलमध्ये काहीतरी घेऊन चालल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. यावरुन आम्हाला संशय आला. त्यानंतर आरोपीने परिधान केलेल्या जॅकेटवर अकोल्यातील एका गावाचं नाव होतं. त्यासंदर्भाने आम्ही पोलीस तपास केला. त्या गावातून आम्हाला आरोपीचे माहिती समजली. त्यानंतर आम्ही दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
धंगेकरांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सांगितला जॉर्ज फर्नांडिस यांचा किस्सा; वाचा..
या प्रकरणी प्रियकर संतोष देवमन जामनिक (25) आणि आई लक्ष्मी संतोष गवई (वय 26) या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोघेही रा. खेरपुडी, ता. बाळापूर, जि. अकोला येथील रहिवाशी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर ते पुण्यात काही दिवसांपूर्वी पळून आले होते. पळून येताना 3 वर्षाच्या मुलीला सोबत आणले होते. त्यानंतर मुलीच्या सततच्या रडण्याने त्यांच्या प्रेमाला अडथळा येत होता. आपल्या प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी प्रियकर संतोष आणि आई लक्ष्मी यांनी त्या चिमुरडीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह खडकी स्टेशनजवळ फेकून दिला. त्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आहे.