Pune Lok Sabha Polling Avg : आज महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. (Pune Lok Sabha) त्यामध्ये पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठीही मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली असून, शिरूर आणि मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचं चित्र समोर आलं आहे.
मतदानात फूट पडणार
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. परंतु, या मतदारसंघातून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात असल्याने मतदानात फूट पडणार असल्याची चर्चा होती. पुणे लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 49.82 टक्के मतदान झाले होते.
पुणे लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (अंतिम सरासरी आकडेवारी) : ५०.३२%
विधानसभा निहाय:
कसबा पेठ ५७.९०
कोथरूड ४९.१०
पर्वती ४६.८०
पुणे कॅन्टोन्मेंट ५०.५२
शिवाजीनगर ४९.७२
वडगाव शेरी ४९.७१
मावळ लोकसभा मतदारसंघ :
५२.९० %
चिंचवड ४९.४३
कर्जत ६०.१२
मावळ ५३.०२
पनवेल ४९.२१
पिंपरी ४८.२५
उरण ६४.७५
शिरूर लोकसभा मतदारसंघ :
५१.४६ %
आंबेगाव ६१
भोसरी ४६.२१
हडपसर ४५.३६
जुन्नर ५६.३५
खेड आळंदी ५५.२९
शिरूर ५३.०५