पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची हजारो कोटींची फसवणूक केलेली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डी. एस. कुलकर्णी ( DSK ) हे पाच वर्षे तुरुंगात होते. ते आता तुरुंगाबाहेर आहेत. त्यांनी DSK Talks नावाचा युट्यूबवर शो सुरू केला आहे. त्या शोमध्ये डीएसके यांनी ठेवीदारांकडून घेतलेले पैशांबाबत धक्कादायक दावा केला आहे. मुंगीला नख असते तर नखाच्या मळा एेवढ्या डीएसकेचा गुन्हा नाही, असा डीएसके यांनी आपल्या शोमध्ये केला आहे.
काही दृष्टशक्तीमुळे बंगल्याच्या पत्त्याप्रमाणे माझा व्यवसाय कोसळला आहे. पण हारलेलो नाही. मला आयते मिळालेले नाही. मुंगीला नख असते तर तिच्या नखाच्या मळा एेवढ्या डीएसकेचा गुन्हा नाही. 43 वर्षी मी न चुकता पैसे दिले. एकही तक्रार नव्हती. 55 वर्षे उभे केलेले चाळीस हजार लोकांचे साम्राज्य पत्त्याचा बंगला कोसळतो तसा कोसळला. मी नाही हिम्मत हरलोय. सध्या सगळीकडे कोर्ट कचऱ्या आहेत. मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवला आहे. मुंगीला नख असेल तर नखाच्या मळाएेवढ्या डीएसकेचा गुन्हा नाही. सगळं परत उभे करत आहे. मी कुठेलाही लॉस मेकिंग नाही. पळून गेलेले नाही. हरलेलो नाही. तुमचे पैसे घेतले आहेत. 43 वर्षे तुम्हाला पैसे देतो. एकही तक्रार नाही, पैसे दिलेले नाही म्हणून तक्रार नाही, असा दावा डीएसके यांनी केलाय.
तुम्ही दिलेले पैसे प्रॉपर्टीमध्ये गुंतवलेले आहेत. दुबई, सिंगापूरला लपवून ठेवले असते तर सापडले असते. तुमचे पैसे समजा पाचशे कोटी आहे. बँकेचे तीनशे कोटी, माझे जमा झालेले व्यवसायाची कितेक कोटी आहेत. या पैसेतून प्राॅपर्टी घेत होतो. वर्षाला 11 टक्के व्याज देत देणे परवडत होते. ड्रीम सिटी, बालेवाडी, बाणेर, मुंबईतील प्रोजेक्टमध्ये तुमचे पैसे गुंतविले होते, असे डीएसकेंचे म्हणणे आहे.
रिअल इस्टेटमध्ये भाव वाढतात. तिथे तुमचे पैसे सेफ आहेत. डीएसकेच्या प्रॉपर्टी सरकारने जप्त केल्या आहेत. मला त्या प्रॉपर्टीमध्ये पाऊल ठेवून दिले जात नाही. आयबीसी अॅक्ट, दिवाळीखोरी कायद्यानुसार चाळीस कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ती फक्त दहा कोटींमध्ये दिली जात आहेत. ज्या प्रॉपर्टीमध्ये पैसे गेले आहेत. त्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे. त्या विकून पैसे दिले पाहिजे. परंतु सरकारगही प्रॉपर्टी विकत नाही. चार बिल्डरांना लिलावात प्रॉपर्टीज मिळाल्या आहेत. परंतु त्यांनी प्रोव्हिजन केलीय, आम्ही कुणाला पैसे देणार नाही, असा आरोपही डीएसके यांनी केलाय.
माझी कंपनी अडचणीत आणली गेलीय. कचऱ्याच्या भावात घेतली गेलीय. ती मिळविण्यासाठी आंकड तांडव करतोय.
मी पैसे खिशात ठेवललेले नाहीत. पैसे प्रॉपर्टीत गुंतविलेले आहे. प्रॉपर्टी विकून सहा महिन्यात पैसे देऊ शकतो. कोर्टाने लिलाव करावा. मी विरोध करत नाही. एफडी होल्डरांचे पैसे गुंतवलेल्या ड्रीमसिटी, बालेवाडीचा लिलाव करावा. परंतु त्याचा लिलाव न करता त्या फुकट दिल्या जात आहे. त्या परत मिळविण्यासाठी धडपडतोय. त्याला लिलाव करून पैसे देता येतील, असे डीएसके म्हणाले.
