पुणेः इंडिया आघाडीतील काही नेते हे उद्योगपती गौतम अदानींविरोधात (Gautam Adani) राळ उठवत असतात. पण या आघाडीतील नेते शरद पवार (Sharad Pawar) हे कायम अदानींच्या बाजूने बोलत असतात. त्यांना पाठिंबा दर्शवित असतात. आता तर एका आर्थिक मदतीसाठी पवारांनी अदानींची जाहीरपणे आभार मानले आहेत. पवारांच्या संबंधित बारामती विद्या प्रतिष्ठानच्या रोबोटिक्स स्टेशनला अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी तब्बल 25 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचे आभार मानले आहे.
फेसबुक-इन्स्टाग्रामला ठोठावला कोट्यावधींचा दंड, यूट्यूब-गुगलवरही कडक कारवाई
विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनियरिंग विभागामध्ये रोबोटिक सेंटरचे उद्घाटन शरद पवार, फिनोलेक्स कंपनीचे उद्योगपती दीपक छाब्रिया यांच्या हस्ते झाले. त्याचवेळी या सेंटरसाठी अदानी यांनी 25 कोटींची देणगी दिली असल्याचा उल्लेख पवार यांनी करत त्यांचे आभार मानले आहे. देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची इमारत बारामतीत उभी राहत आहे. भविष्यात कृषीसह इतरही विषयांवर येथे संशोधन होईल, असे पवार म्हणाले.
हे सेंटर उभारण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. एका सहकाऱ्याने दहा कोटी देण्याचा निर्णय घेतला. तर हा प्रकल्प कृतीमध्ये आणण्यासाठी आणखी एका सहकाऱ्याने मदत केली आहे. गौतम अदानींचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी 25 कोटींचा धनादेश संस्थेकडे पाठविले आहे. त्यांच्यामुळे हा प्रकल्प आम्ही उभा करू शकले, असे शरद पवार म्हणाले.
‘मी कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेच्या स्मरणशक्तीत गडबड’; भुजबळांनी डिवचलं
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी उद्योगसमूहाकडे गेले आहे. त्याविरोधात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला होता. अदानी समूहावर व भाजपवर आरोप केले होते. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधीही गौतम अदानी व भाजपवर अनेकदा आरोप केले आहे. परंतु शरद पवार हे अनेकदा गौतम अदानींची पाठिशी उभे राहिले आहेत.