फेसबुक-इन्स्टाग्रामला ठोठावला कोट्यावधींचा दंड, यूट्यूब-गुगलवरही कडक कारवाई

फेसबुक-इन्स्टाग्रामला ठोठावला कोट्यावधींचा दंड, यूट्यूब-गुगलवरही कडक कारवाई

Facebook-Instagram fined : मेटाचे जगभारात लाखो युझर्स आहेत. मेटाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामकडे (Instagram) लोक मनोरंजनाचा भाग म्हणून पाहतात पण या दोन्ही कंपन्यांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामला तब्बल 53 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीतील कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. इटलीमध्ये बंदी असलेल्या जुगाराच्या जाहिराती दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

फेसबुक-इन्स्टाग्रामला दंड का ठोठावला?
इटलीच्या कम्युनिकेशन्स रेग्युलेटर एजीकॉमच्या म्हणण्यानुसार, मेटावर आरोप आहे की फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाइल आणि खात्यांवरून जुगाराच्या जाहिराती दाखवल्या होत्या. कंपनी अशा कंटेंटचा प्रचार करत होती की ज्यामध्ये जुगार किंवा गेममध्ये रोख बक्षिसे दिली जात होती. हे पाहता एजीकॉमने मेटाला 5.85 दशलक्ष युरो म्हणजेच 6.45 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला.

मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार

यूट्यूबवरही दंड ठोठावला
अशा जाहिराती दाखवल्याबद्दल इटलीच्या कम्युनिकेशन्स रेग्युलेटर एजीआयकॉमने एकामागून एक अनेक कंपन्यांना दंड ठोठावला आहे. मात्र, याबाबत मेटाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, AGCom ने Alphabet Inc च्या YouTube ला 2.25 दशलक्ष युरो आणि ट्विटरला 9 लाख युरो असा दंड ठोठावला होता.

31 December 2023 Deadline : 31 डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा सहन करावा लागेल मोठा तोटा…

गुगललाही मोठा दंड ठोठावला
21 डिसेंबर रोजीच एका अमेरिकन कोर्टाने जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलवर सुमारे 700 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. यामध्ये 10 कोटी लोकांमध्ये 63 कोटी डॉलर्स वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच वेळी, $70 दशलक्ष निधीमध्ये जमा केले जातील. अँड्रॉइड प्ले स्टोअरचा गैरवापर करून युजर्सकडून अधिक पैसे उकळल्याप्रकरणी कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अँड्रॉइड प्ले स्टोअरवर अॅप-मधील खरेदी आणि इतर बंदी लादून कंपनी पैसे उकळत होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube