31 December 2023 Deadline : 31 डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा सहन करावा लागेल मोठा तोटा…
31 December 2023 Deadline : 2023 वर्षाचं काऊंडाऊन सुरु झालं आहे. आता नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली झाली आहे. नवीन वर्षाच्या(new year 2024) सुरुवातीपासून काही नवीन बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार्या वर्षामध्ये काही आर्थिक क्षेत्रातील (Financial sector)बदल देखील होणार आहेत. काही कामं ही आपल्याला 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत, अन्यथा मोठा आर्थिक फटका (Financial hit)बसण्याची दाट शक्यता आहे.
Lili Thomas : राहुल गांधी ते सुनील केदार : सगळ्यांची अडचण ‘या’ महिलेने केलीये!
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशीरा आयकर रिटर्न भरणे. त्याशिवाय, डिमॅट (Demat)आणि म्युच्युअल फंड (Mutual funds)खात्यात नॉमिनी जोडणे, बंद पडलेला UPI आयडी पुन्हा सुरु करणे आणि बँक लॉकरच्या (Bank Locker)नवीन करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे, कारण या कामांची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी ही कामं पूर्ण करुन घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
नगर शहरातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार, सहा कोटींचा निधी मंजूर
दंडासह आयकर न भरल्यास कारवाई :
यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयकर रिटर्न भरणे कारण, आर्थिक वर्ष 2022-23 साठी दंडासह उशीरा आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. आयकर कायद्याच्या कलम 234 एफ अंतर्गत मुदतीपूर्वी रिटर्न न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर उशीरा आयटीआर भरणाऱ्यांना 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांना फक्त एक हजार रुपये दंड भरुन आयटीआर भरता येणार आहे. 31 डिसेंबरनंतर त्यांनाही 5 हजार रुपये दंड भरावा लागेल.
लॉकर फ्रीज होईल
दुसरं महत्वाचं काम म्हणजे बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करणं. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर बँक ग्राहकानं बँक लॉकर करारावर सही केली नाही तर त्याचं लॉकर गोठवलं जाणार आहे.
नवीन सिम कार्ड खरेदी करण्याचे नियम :
1 जानेवारी 2024 पासून नवीन सिम कार्ड खरेदीचे नियमही बदलणार आहेत. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, ग्राहकांना आता पेपर आधारित प्रक्रियेद्वारे केवायसी सबमिट करावी लागणार आहे. फक्त टेलिकॉम कंपन्या ई-केवायसी करणार आहेत. नवीन मोबाईल कनेक्शन घेण्याचे बाकीचे नियम कायम राहणार आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. 31 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांद्वारेच सिमकार्ड मिळणार आहेत.
डिमॅट खात्यांमध्ये नॉमिनीचे नाव जोडणे :
SEBI च्या नियमानुसार 1 जानेवारी 2024 पर्यंत सर्व डिमॅट खातेधारकांना नामांकन दाखल करणं बंधनकारक आहे. खातेदारांनी नॉमिनी न लावल्यास, ते शेअर्सचे व्यवहार करु शकणार नाहीत. त्यामुळे नॉमिनी लावण्याची अंतिम मुदत आधी 30 सप्टेंबर होती, ती तीन महिन्यांनी वाढवली होती.
UPI आयडी सक्रिय करण्याची शेवटची संधी
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने पेमेंट अॅप्स (गुगल पे, पेटीएम, फोन पे) ते UPI आयडी बंद करण्यास सांगितले आहे. जे एका वर्षापासून सक्रिय नाहीत असे आयडी बंद केले जाणार आहेत. UPI द्वारे पेमेंट करणार्या ग्राहकांना त्यांचा आयडी सक्रिय करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.