नगर शहरातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार, सहा कोटींचा निधी मंजूर

  • Written By: Published:
नगर शहरातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार, सहा कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर : आगामी निवडणुकांपूर्वी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ सुरु झाला आहे. यातच नगरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नगर शहरातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार आहे. शहरातील दोन बसस्थानकांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. तारकपूर बस स्थानकातील (Tarakpur Bus Stand) कॉंक्रिटीकरण कामासाठी तीन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर स्वस्तिक चौक पुणे बस स्थानकातील कॉंक्रिटीकरणासाठी 2 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती नगर शहराचे आमदार संग्राम जगता (Sangram Jagtap) यांनी दिली आहे.

Ankita Lokhande: बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेने घेतली पती विकी जैनची बाजू 

अहमदनगर शहरात तीन प्रमुख बसस्थानके आहेत. यापैकी तारकपूर आणि पुणे बसस्थानकांवर इतर तालुके व जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेसची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे हजारो प्रवासी येथून ये-जा करतात. याचबरोबर शाळकरी विद्यार्थी एसटीचा प्रवास करून शिक्षणासाठी शहरात दररोज येत असतात. मात्र, तारकपूर व पुणे बस स्थानकाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर मोठमोठे खड्डे पडले असून प्रवाशांना या समस्येमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पवार 101 टक्के PM झाले असते; 1996 मध्ये घडलेला घटनाक्रम पटेलांनी शब्दशः सांगितला 

दरम्यान, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडे विकास कामासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे तारकपूर बस स्थानकातील अंतर्गत कॉंक्रिटीकरण कामासाठी पाठपुरावा केला होता. आता या कामासाठी तीन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर स्वस्तिक चौक पुणे बस स्थानक अंतर्गत कॉंक्रिटीकरणासाठी २ कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे बसस्थानकाच्या विकास कामात मोठी अडचण निर्माण होत आहे. बस स्थानकातील विकासाचे व सुशोभिकरणाचे काम मार्गी लागावे, याासाठी राज्य शासनाने एमआयडीसी विभागातून एसटी महामंडळाला कर्ज स्वरुपात सुमारे 5 कोटी 90 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे तारकपूर बस स्थानक आणि स्वस्तिक चौक येथील पुणे बस स्थानक अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. हे काम लवकरच सुरू होऊन प्रवाशांची गैरसोय दूर होईल. यापूर्वीही माळीवाडा मुख्य बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला, असं जगताप म्हणाले.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube