Ahmednagar News : नगरमधून मुलं-मुली बेपत्ता; संग्राम जगतापांचं पोलिस अधीक्षकांकडं साकडं
Ahmednagar News : शहरातील मुलं-मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास लावण्यासंबंधी तातडीने तपास करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात; उच्च न्यायालयात याचिका दाखल
शहरातील मुलं-मुली बेपत्ता होतात त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार करूनही पोलीस मात्र तपास लावण्यात अपयशी ठरत आहे. मुलांचा तपास लागत नसल्याने कुटुंबीय नातेवाईक हे मात्र चिंताग्रस्त झाले आहेत, बेपत्ता मुलांच्या आई-वडिलांची मानसिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे, आपल्या मुलांचा आज तरी शोध लागेल या आशेने ते वाट पाहत आहे.
दिवसामागून दिवस निघून जात आहेत, तरीही या बेपत्ता मुलांचा काहीच थांगपत्ता लागत नाही, शहरातील मुलामुलीं बेपत्ता होऊन जवळपास २० ते २५ दिवस झाले परंतु पोलिसांना तपास लावण्यात यश मिळाले नाही. तरी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन बेपत्ता मुलामुलींचा तपास तातडीने करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी, पालक नातेवाईक उपस्थित होते.
खळबळजनक! कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी : 15 लाखांसह ‘ईडी’ अधिकाऱ्याला अटक
शहरातील 15 वर्षीय विद्यार्थी दि. १८ ऑक्टोबरपासून बेपत्ता असून कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद देऊनसुध्दा अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. यासोबतच एक 30 वर्षीय मुलगी अहमदनगर शहरातून दि. १२ ऑक्टोबरपासून आहे. कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली असून तिचा सुध्दा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही.
Maratha Reservation : आमदार शहाजी पाटलांनी मागितली आंदोलकांची माफी; पंढरपुरात काय घडलं?
दोन्ही परिवारातील कुटुंबिय मुले न सापडल्यामुळे चिंताग्रस्त झालेले आहे. तरी, अहमदनगर शहरातील दोन मुले बेपत्ता असून तातडीने तपास करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.