Maratha Reservation : आमदार शहाजी पाटलांनी मागितली आंदोलकांची माफी; पंढरपुरात काय घडलं?
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनांचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडला. येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची कार अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चांगलीच वादावादी झाली. अखेर आमदार पाटील यांनी आंदोलकांची माफी मागितली. त्यानंतरच त्यांची कार मार्गस्थ झाली. पंढरपूर येथील ठाकरे चौकातून आमदार शहाजी पाटील यांची कार जात होती. त्यावेळी काही मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची कार अडवली. यावेळी आंदोलक आणि शहाजी पाटील यांच्या कारचालकामध्ये वादावादी झाली. यानंतर मात्र आंदोलक चांगलेच संतापले. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच आमदार पाटील यांनी खाली उतरून आंदोलकांची माफी मागितली. यानंतर आंदोलकही शांत झाले आणि पाटील यांची कार सांगोल्याकडे मार्गस्थ झाली.
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत…’
पाण्याला हात लावणार नाही – जरांगे पाटील
गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी सांगितले की, राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
सरकारला आरक्षण द्यावेच लागणार
मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. मला माझ्या जातीवर अन्याय मला सहन होणार नाही. जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोटे गुन्हे दाखल केल्या आहेत. जाणूनबुजून प्रशासन सरकारच ऐकून आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला. आता मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. असे आंदोलनाचे 6-7 टप्पे होणार आहेत. या एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतरही आंदोलक दगडफेक करत असून एकूणच वातावरण तणावाचे बनले आहे.