संग्राम जगतापांच्या पाठपुराव्यामुळे शहर विकासाला गती मिळेलः कृषिमंत्री धनंजय मुंडे

  • Written By: Published:
संग्राम जगतापांच्या पाठपुराव्यामुळे शहर विकासाला गती मिळेलः कृषिमंत्री धनंजय मुंडे

अहमदनगर : शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप हे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे विकासकामासाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेसपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी माझ्याकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून दर्जेदार रस्ता काँक्रीट करण्याचे काम मार्गी लागले आहे. विकास कामातून नगर शहराचे रूप बदलत असल्याचे दिसत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी विकासकामांसाठी राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाची कामे करीत असल्यामुळे नागरिकांची ऋणानुबंध निर्माण झाला आहे. आमदार संग्राम जगताप यांना शहर विकासासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेशीपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, निखिल वारे, सुनील कोतकर, बाळासाहेब पवार, मनीष साठे, संभाजी पवार, अभिजीत खोसे, सुमित कुलकर्णी, उबेद शेख, शहर अभियंता मनोज पारखे, नगरसेवक विपुल शेटिया, भा कुरेशी, विजय गव्हाळे, सुरेश बनसोडे, महेंद्र कांबळे, संजय गाडे, युवराज शिंदे, परिमल निकम आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरातील रस्त्याची कामे कायमस्वरूपी मार्गी लागावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. त्या माध्यमातून शहर विकासाला टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होत आहे. शहरांमध्ये दर्जेदार कायमस्वरूपीची रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेस पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता त्यांच्या हस्ते या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube